Download App

Kasba By Election : कसब्यातील मतदार हिंदुत्ववादी : फडणवीस यांनी केली मांडणी

पुणे : हा कसबा हिंदुत्ववादी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं पुणे आहे, इथे देशभक्तांचा मेळा पाहायला मिळत असल्याची मांडणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोचा शनिपार चौकात समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. या रोड शोमध्ये फडणवीसांनी कसबा पेठ मतदारसंघ हिंदुत्ववादी कसा याची मांडणी केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोटनिवडणुकीत विरोधकांकडून अनेक नरेटिव्ह करण्याच प्रयत्न करण्यात आला. इथला ब्राम्हण समाज नाराज असल्याचं त्यांनी सांगितलं. ही लढाई भाजप काँग्रेस नाहीतर रासने धंगेकर लढाई असल्याचा नरेटिव्ह केला मात्र,कोणी कितीही नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला तरीही तो नरेटिव्ह तयार होणार नसल्याचं ठामपणे फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलंय.

मी देत आहे राष्ट्रवादीला शाप.. कारण निवडून येणार अश्विनी जगताप : रामदास आठवले

मोदींना हरवण्यासाठी देशभरातील मुसलमान आम्ही इथं आणू राष्ट्रवादीकडून बोललं जातंय. हे सांगतात तेव्हा आता ही लढाई धंगेकर किंवा रासने लढाई नाहीतर राष्ट्रीय विचारांचे लोकं आणि ज्यांचा काश्मीरला विरोध आहे, असे लोकं ज्यांनी 370 कलम हटवलं, असे लोकं आणि 370 कलम हटलं तरी अजूनही छात्या बडवतात अशा लोकांची असल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलंय.

Sharad Pawar यांची ही खेळी… पण धनंजय मुंडे यांना धक्काबुक्की का झाली?

तसेच यावेळी त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार टीकाही केली असून काँग्रेसचा उमेदवार निवडूनच येणार असल्याचा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. आणि जरी निवडून आलाच तर त्याला पुण्यश्वर महादेवाबद्दल तुमची भूमिका काय? असा सवाल त्यांनी केला आहे.

Sharad Pawar : आमदारांना फोडून भाजपने ठाकरेंची सत्ता घेतली… जनता धडा शिकवेल!

ही निवडणूक आता एका मतदारसंघाची असली तर ती वैचारिक झाली आहे. अठरा पगड जातीचे लोकं भाजपसोबत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लहुजी वस्ताद साळवे यांचे विचार सांगणार आम्ही लोकं आहोत, त्यांच्या विचारांचा रथ पुढे नेण्याचं काम भाजप महायुती करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us