मोठी बातमी : व्हीएसआर व्हेंचर्सला मोठा दणका; लेयर जेट विमानाच्या उड्डाणाला मनाई

Layer Jet : विमान अपघातानंतर विमान वाहतूक संचालनालयाने लेयर जेटच्या विमानाचे विशेष ऑडिट केले आहे. त्यानंतर ही कारवाई झालीय.

Ajit Pawar Vsr Lazer Jet

Ajit Pawar Vsr Lazer Jet

Layer Jet aircraft banned from flying: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे विमान अपघात मृत्यू झाल्यानंतर विमान पुरविणाऱ्या व्हीएसआर (VSR Aviation) कंपनीवर शंका उपस्थित केली जात होती. अजित पवार (Ajit Pawar) यांना लेयर जेट हे विमान पुरविण्यात आले होते. विमान अपघातानंतर विमान वाहतूक संचालनालयाने लेयर जेटच्या (Layer Jet) विमानाचे विशेष ऑडिट केले आहे. हे ऑडिट झाल्यानंतर लेयर जेट विमानाच्या उड्डाणाला विमान वाहतूक संचालनालयाने मनाई केली आहे. त्यामुळे विमान पुरविणाऱ्या व्हीएसआर व्हेंचर्सला मोठा दणका बसला आहे. (VSR Ventures suffers a major blow; Layer Jet aircraft banned from flying)

ऑडिटमध्ये त्रुटी

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर या कंपनीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर कंपनीकडून या कंपनीच्या विमानांचे ऑडिट करण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. यात आता अनेक त्रुटी आढळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे डीजीसीएने आता या कंपनीच्या चार मॉडेलच्या उड्डाणांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर ही या कंपनीवर करण्यात आलेली सर्वात मोठी कारवाई आहे.

अहवालाकडं लक्ष

दरम्यान, रोहित पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच अनेकांनी या अपघाताच्या तपासावरही शंका उपस्थित केली आहे. या विमानाचा ब्लॅक बॉक्स रिकव्हर करण्यात आला आहे. या बॉक्समधील डेटाचे विश्लेषण केले जात आहे. यातून या विमानाचा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला? अपघाताच्या आधी विमानात काही समस्या निर्माण झाली होती का? याचा उलगडा होणार आहे. त्यामुळे आता या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही कारवाई झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी एक ट्वीट केलंय. ते म्हणाले, VSR कंपनी कुठलेही compliances फॉलो करत नाही. अत्यंत मनमानी पद्धतीने असुरक्षितपणे विमाने उडवत असल्याचा मुद्दा आम्ही वारंवार मांडत आहोत आणि आज DGCA ने त्याच नॉन compliance च्या मुद्द्यावर VSR ची चार विमाने ग्राउंड केली आहेत. आपल्या लढ्याला यश येत असले तरी हे केवळ नखाएवढे आहे. अजून बरेच काही समोर यायचा बाकी आहे. उद्या सकाळी या विषयावर सविस्तर बोलणार आहे.

Exit mobile version