Ajit Pawar Plane Crash : दादांना घेऊन निघालेल्या VSR एव्हिएशनचा तीन वर्षांत दुसरा अपघात

बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. विमानाचे आपत्कालीन लँडिंग करताना हा भीषण अपघात झाला.

  • Written By: Published:
Ajit Pawar Plane Crash : दादांना घेऊन निघालेल्या VSR एव्हिएशनचा तीन वर्षांत दुसरा अपघात

Second Accident In Three Years For VSR Aviation, Operator Of Ajit Pawar’s Private Jet : बुधवारी (दि.28) सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. बारामतीला जाणाऱ्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करताना हा भीषण अपघात झाला. अजितदादांच्या अकाली निधनानंतर बारामतीला जाणारे विमान चर्चेत आले आहे. दादांना घेऊन निघालेले विमान हे लिअरजेट 45 विमान होते, जे व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे चालवले जात होते. ही कंपनी नवी दिल्लीहून काम करते. आज झालेला अपघात हा या कंपनीच्या विमानाचा तीन वर्षातील दुसरा अपघात असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी  सप्टेंबर 2023 मध्ये मुंबईत याच कंपनीच्या व्हीटी-डीबीएलच्या विमानाचा अपघात झाला होता. त्यानंतर आज याच विमान कंपनीच्या लिअरजेट 45 या खासगी जेटचा दुसरा मोठा अपघात झाला आहे.

विमान कंपनी कुणाच्या मालकीची?

व्हीएसआर एव्हिएशनची मालकी विजय कुमार सिंग यांच्याकडे असून, लिअरजेट 45 हे दोन इंजिन असलेले हलके बिझनेस जेट आहे जे कॉर्पोरेट आणि व्हीआयपी प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. प्रकाशित वृत्तानुसार व्हीएसआर एव्हिएशनच्या अधिकृत वेबसाइटवरून असे दिसून येते की, ही फर्म 60 हून अधिक वैमानिकांचा पोर्टफोलिओ आणि 15 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या व्यावसायिकांना चार्टर्ड विमान देते. कंपनीने हॅवेल्स इंडिया, वेल्सपन आणि एपीएल अपोलो यांना प्रमुख ग्राहक म्हणून सूचीबद्ध केले आहे. व्हीएसआर एव्हिएशनद्वारे दिल्या जाणाऱ्या काही मुख्य सेवांमध्ये खाजगी जेट चार्टर, खाजगी जेट भाडेपट्टा, एअर अॅम्ब्युलन्स यांचा समावेश आहे.

विमानाची तांत्रिक वैशिष्ट्ये काय आहेत?

लिअरजेट 45 एक्सआरमध्ये आठ प्रवासी बसू शकतात. याची रेंज अंदाजे 2000 ते 2,235 नॉटिकल मैल आहे आणि ते 51000 फूट उंचीवर पोहोचू शकते. हे विमान दोन हनीवेल टीएफई 731 इंजिनांनी चालवले जाते आणि त्याचा क्रूझिंग वेग मॅक 0.78 ते 0.81 दरम्यानचा आहे. हे जेट विमान प्रामुख्याने कमी आणि मध्यम अंतराच्या उड्डाणांसाठी डिझाइन केलेले आहे. या विमानाचे पंख सुमारे 47 फूट आणि एकूण वजन सुमारे 9,752 किलोग्रॅम आहे. हे सामान्यतः व्हीआयपी आणि व्यावसायिक चार्टर्ससाठी वापरले जाते.

अपघातग्रस्त विमानाचा तपशील

विमान कोणतं होतं Learjet 45
हे विमान कोणत्या कंपनीने बनवलं होतं : Bombardier
विमान कंपनीचं ऑपरेटर : VSR
एयरक्राफ्ट टाइप : Learjet 45
एयरक्राफ्ट रजिस्ट्रेशन: VT-SSK

follow us