Pune Water Crisis : पुण्यात वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर काही भागात अखेर पाणी कपात लागू करण्यात आली आहे. शहरात पाण्याची मागणी 25 टक्के पेक्षा अधिक वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. (Water) पाण्याच्या मागणी एवढा पुरवठा करणे शक्य नसल्याने महापालिकेकडून अखेर शहरात पाणी कपात सुरू करण्यात आली आहे.
पाणी कपातीमध्ये शरहातील कात्रज, आंबेगाव, धायरी, सिंहगड रस्ता परिसर येतो. या भागात आता आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवलं जाणार आहे. दरम्यान, या परिसराला महापालिकेच्या वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा करण्यात येतो. उपलब्ध पाणी कमी पडत असल्याने कात्रज परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत होत असून सर्व भागात पुरेसे पाणी देण्यासाठी आता आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवले जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. निर्णयाची अंमलबजावणी सोमवार 5 मे पासून करण्यात येणार असून रोटेशन पद्धतीने हे पाणी दिले जाणार असल्याचंही महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.
महाराष्ट्र दिनाच्या; पूर्वसंध्येला मुरलीधर मोहोळ यांनी लाखो पुणेकरांना दिली आनंदाची बातमी
कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून नागरिकांना उल्हास नदीतून पाणीपुरवठा केला जातो. या नदीत सोडले जाणारं सांडपाणी आणि नदीला पडलेला जलपर्णीचा विळखा यामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ होत होती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मशिनरीच्या साहाय्याने हे काम हाती घेतले आहे. सांडपाणी रोखण्यासाठी देखील उपयोजना सुरू केल्या आहेत. त्या पाठोपाठ प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदीच्या विविध भागातील 70 ठिकाणचे पाण्याचे नमुने गोळा केले आहेत. या पाण्याची तपासणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रयोगशाळेत केली जाणार आहे.
अनेक ठिकाणचे घेतले नमुने
उल्हास नदी जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या नदीत बदलापूर पासून कल्याणपर्यंत ठीकठिकाणी नाल्यातील घरगुती आणि रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याने नदीतील पाण्याची पातळी दूषित झाली आहे. सांडपाण्यावर वाढणाऱ्या जलपर्णीने नदीपात्रावर आच्छादन धरल्याने नदीतील पाण्याच्या शुद्धतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.