Water Tank Collapse In Pimpri Chinchwad several Died In Bhosari : पिंपरी चिंचवडमधून (Water Tank Collapse In Pimpri Chinchwad) एक मोठी बातमी समोर आलीय. पिंपरी चिंचवडमधील भोसरी परिसरात पाण्याची टाकी कोसळून 4 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भोसरीतील (Bhosari) सदगुरुनगर या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले असून अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
या ठिकाणी लेबर कॅम्पमधील काही कामगार राहत होते. बिल्डरने तकलादू पद्धतीने ही पाण्याची टाकी उभारली होती, असा आरोपही नागरिकांनी केला आहे. आज 24 ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे 7च्या दरम्यान ही दुर्घटना घडली (Pune News) आहे.
मोठी बातमी! ठाकरेंच्या यादीत ट्विस्ट, धाराशिवमधील ‘या’ मतदारसंघातील उमेदवार बदलणार
टाकीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आतापर्यंत चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर काही कामगार जखमी झाले आहेत. अजूनही काही कामगार ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत, त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
पुण्यात पाण्याची टाकी कोसळून भीषण दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवडमधील अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या हा ढिगारा हटवून जखमींना बाहेर काढले जात आहे. तसेच सध्या जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे.मात्र या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह काढण्यास नातेवाईकांडून विरोध दर्शवला जात आहे. पाण्याची टाकी अचानक कोसळल्यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला होता.
सावधान! प्रदूषणामुळे होतोय डोळ्यांचा ‘हा’ आजार; काळजी घ्या, डोळ्यांचं आरोग्य जपा
लेबर कॅम्पमध्ये राहणाऱ्या कामगारांवर ही पाण्याची टाकी कोसळली आहे. अनेक कामगार टाकीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडलेत. घटना घडल्यानंतर तातडीने पोलीस आणि अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आलीय. सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे. ढिगाऱ्याखाली कामगारांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, यादरम्यान आतापर्यंत चार कामगार मृत्यूमुखी पडल्याची बातमी समोर येतेय. यावेळी स्थानिकांनी घटनास्थळी मोठ्याप्रमाणात गर्दी केलीय.