Chinchwad Bypoll : कलाटेंना भाजपचा छुपा पाठिंबा ? ; शहराध्यक्ष लांडगे स्पष्टच बोलले..

Chinchwad Bypoll : कलाटेंना भाजपचा छुपा पाठिंबा ? ; शहराध्यक्ष लांडगे स्पष्टच बोलले..

Chinchwad Bypoll : पिंपरी चिंचवड निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू असून स्टार प्रचारकांच्या सभा होत आहेत. पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad Bypoll) मतदारसंघात राहुल कलाटे (Rahul Kalate) हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे येथील निवडणूक आता तिरंगी होणार आहे. या निवडणुकीत कलाटे यांना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. या प्रश्नावर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, कलाटे यांचा आणि भारतीय जनता पार्टीता कसलाही संबंध नाही. त्यांना आघाडीने तिकीट का नाकारले हा त्यांचा अतंर्गत प्रश्न आहे. ‘लेट्सअप’ प्रतनिधीने लांडगे यांच्याशी संवाद साधला.

ते पुढे म्हणाले, ही निवडणूक भाजपसाठी सोपी आहे. आघाडीच्या उमेदवारांचे कोणतेही आव्हान नाही. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा येथे मोठा प्रभाव आहे.शहराच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांचे हे योगदान कुणीही विसरणार नाही. तसे पाहिले तर ही निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे होते. मात्र तसे घडले नाही. याबाबत पिंपरी चिंचवडमधील नेत्यांनी विचार करायला हवा होता.भाजप नेते संवादात कमी पडले का, या प्रश्नावर लांडगे म्हणाले की आम्ही सर्व नेत्यांना भेटलो आहोत. येथील निवडणूक आता कार्यकर्त्यांनी हातात घेतली आहे.येथे आम्ही सरकारचे काम आणि विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करत आहोत.

हे सुद्धा वाचा : Rahul Kalate यांच्यासाठी;गुड न्यूज; प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीला झटका

अपेक्ष उमेदवार कलाटे यांना भाजपचा छुपा पाठिंबा आहे असे म्हणणे बरोबर नाही. कलाटे हे महाविकास आघाडीकडूनच तिकीट मागत होते. त्यांच्यात काही वाद झाले असतील त्याबाबत आम्हाला माहिती नाही. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पक्ष म्हणून आम्ही आमचे काम करत असतो. वंचित बहुजन आघाडीनेही (VBA) कलाटेंना पाठिंबा दिल्याने त्यांची ताकद वाढणार का, यावर लांडगे म्हणाले, आमचा पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांवर पूर्ण विश्वास आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube