Download App

Video : दहा लाखांची मागणी करून गर्भवतीचा जीव घेणाऱ्या मंगेशकर रुग्णालयाची मग्रुरी कायम, प्रत्येक प्रश्नाला तेच उत्तर

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीचा झालेला मृत्यू गंभीर असताना अधिकाऱ्यांनी मग्रुरी कायम असल्याचं दिसलं.

  • Written By: Last Updated:

Dinanath Mangeshkar Hospital Death Case Updates : पुण्यात एका गर्भवती महिलेचा रुग्णालयात उपचारांअभावी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडली असून त्यावरून आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यातच आता येथील अधिकाऱ्यांनी मग्रुरी पुन्हा एकदा समोर आली आहे. (Hospital) या प्रकरणाचा पूर्ण अहवाल आम्ही शासनाकडे पाठवला आहे. त्याबात प्रोसेस चालू आहे. माध्यमांमध्ये येत असलेली माहिती अर्धवट असल्याचं रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर म्हणाले आहेत. ते माध्यमांशी बोलत होते. मात्र, यावेळी त्यांनी माध्यमांना सहकार्य केलं नाही.

दहा लाखांची मागणी

या घटनेनंतर राजकीय पक्षांबरोबरच नागरिक संघटनादेखील आक्रमक झाल्या आहेत. एकीकडे राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असतानाच दुसरीकडे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यात दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. गर्भवती महिलेची प्रकृती गंभीर असतानाही १० लाख रुपयांची मागणी रुग्णालयाकडून करण्यात आली होती. मृत महिलेचं नाव तनिशा भिसे असून त्या भाजपाचे विधान परिषद आमदार अमित गोरखेंचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या.

अ‍ॅडमिट होण्याआधीच 10 लाख मागितले, गर्भवती महिलेचा मृत्यू  दिनानाथ रुग्णालयावर भाजप आमदाराचा आरोप

आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुणे शहरातील ठाकरे गटाचे आणि शिंदे गटाचे पदाधिकारी आमनेसामने येत, रुग्णालय प्रशासनाने विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत कारवाईची मागणी केली. त्या आंदोलना दरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे अधिकारी शिरीष याडकीकर प्रसार माध्यमांसमोर भूमिका मांडण्यास आले होते. त्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिरीष याडकीकर यांच्या तोंडावर चिल्लर फेकल्याची घटना घडली आहे.

आरोग्यमंत्र्यांचं आश्वासन

पुण्यातील घटना मनाला सुन्न करणारी आहे. घटनेची पूर्ण चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यातून येणाऱ्या अहवालानुसार संबंधित रुग्णालयावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. मंगेशकर रुग्णालयाची नोंदणी ट्रस्ट कायद्यांतर्गत केली आहे. शासनाच्या सर्व सुविधांचा लाभ अशा रुग्णालयांना मिळत असतो. त्यामुळे अशी पैशांची मागणी संबंधित रुग्णालयाला करता येऊ शकते का? याचीही चौकशी होईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले आहेत.

follow us