पिठासीन अधिकाऱ्यांनी मर्यादा पाळणे गरजेचे; सभापती शिंदेंचा उपसभापती गोऱ्हेंना सल्ला

Ram Shinde on Neelam Gorhe Statement about UBT : पिठासीन अधिकाऱ्यांनी एखाद्या विषयावर स्वतःचे प्रतिकूल मत असले तरी पीठासीन अधिकारी म्हणून मर्यादा पाळल्या पाहिजे. असे सुचक भाष्य विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या मर्सिडीज भाष्य प्रकरणावर व्यक्त केले.
144 लावा नाहीतर 145, जीवाला धोका झाला तर गाठ मराठ्यांसोबत, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
विधान परिषदेचे सभापती झाल्यानंतर पहिल्यांदाच प्राध्यापक शिंदे यांनी नगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे प्रदेश पदाधिकारी प्राध्यापक भानूदास बेरड, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहर सरचिटणीस सचिन पारखी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्राध्यापक शिंदे यांनी मी विधान परिषदेचा सभापती असल्याने व ते पद संवैधानिक असल्याने मत व्यक्त करण्यावर मर्यादा असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मढी ग्रामस्थ मुस्लिम व्यावसायिक बंदी ठराव, नगरचा बिहार झाल्याच्या खा. लंके यांच्या दाव्यावर मत व्यक्त करण्यास त्यांनी नकार दिला.
काय म्हणाल्या होत्या निलम गोऱ्हे?
नवी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. या संमेलनात असे घडलो आम्ही या कार्यक्रमात बोलताना नीलम गोऱ्हे यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, कार्यकर्त्यांना कमी समजण्याचं काहीच कारण नाही. नव्या मॅनेजरचा गल्ला गोळा करण्याचा प्रयत्न तेव्हापासून सुरू होता का असा प्रश्न गोऱ्हेंना विचारण्यात आला. यावर गोऱ्हे म्हणाल्या, कार्यकर्त्याला कमी समजण्याचे काहीच कारण नाही. प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसे यायची आणि त्यांचीच माणसे कार्यक्रमाचे नियोजन करत होते.
शिवभक्तांसाठी पर्वणी! महाशिवरात्रीला बघता येणार देशभरातील ज्योतिर्लिंग आरती… जाणून घ्या सविस्तर
आता जास्त तपशीलात जाणार नाही. उद्धव ठाकरे गटाचे फार लोकही समोर नाहीत. त्यामुळे त्यांच्या गटाचे लोक येथे असते तर मला बोललेले अधिक आवडले असते. नेत्यांना संपर्क नको असेल तर आपण तिथे नकोसे झालो आहोत असे समजावे. दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावर एक पद असे होते असा गौप्यस्फोट डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला.