Supriya Sule : पुण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये महामार्ग उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. परंतु, हा कार्यक्रम गाजला तो सुप्रिया सुळेंच्या भाषणादरम्यान झालेल्या घोषणाबाजीने. या कार्यक्रमात सुप्रिया सुळे बोलायला उभ्या राहिल्या तेव्हा उपस्थितांमधून घोषणाबाजी सुरू झाली. (Supriya Sule) यामध्ये जय श्रीरामसह अनेक घोषणा देण्यात आल्या. यावेळी स्वत: नितीन गडकरी यांच्यासह देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ आणि चंद्रकांत दादा पाटील उपस्थितांना आवरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, उपस्थितांनी घोषणाबाजी काही थांबवली नाही. उलट काहीवेळ सुप्रिया सुळे यांना आपलं भाषण थांबवावं लागलं.
मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद चिघळला; धारावीत तणावपूर्ण स्थिती, शेकडोंचा जमाव रस्त्यावर
फडणवीसांच्या चेहऱ्यावर नाराजी
त्या पुढे बोलताना म्हणाल्या, मी गडकरींचे आभार मानते, तेव्हड्यात उपस्थितांमधील एका व्यक्तीने मानलेचं पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली. सुळे भाषणावेळी उभ्या राहिल्या त्यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली. घोषणा देणाऱ्यांना थांबवण्यासाठी खुद्द फडणवीस आणि गडकरींनीही प्रयत्न केले पण घोषणा सुरूच होत्या. घोषणा थांबल्यानंतर ज्यावेळी सुळे म्हणाल्या की, मी गडकरींचे मनापासून आभार मानते त्यावेळी उपस्थितांपैकी एकाने मानलेच पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली त्यावेळी फडणवीसांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आली.
चालतानाच कोसळले; मनोज जरांगेंची तब्येत खालावली; मंत्री शंभूराजे देसाईंची उपचार घेण्याची विनंती
उत्तर देऊ शकते
या सर्व घोषणांचा प्रकार पाहून सुप्रिया सुळेही काहीशा नाराज झाल्या आणि संतप्तही दिसून आल्या. त्या म्हणाल्या मी सुद्धा उत्तर देऊ शकते. पण ते हे व्यासपीठ नाही. आपण पक्षासाठी नाही तर नितीन गडकरी यांचे आभार मानण्यासाठी एकत्र आलो आहोत. तसंच, रस्त्यांवरूनही त्यांनी चांगलेच टोमणे मारले. गडकरींनी केलेले रस्ते फक्त चांगले नाही तर टीकावू आहेत. बाकी रस्त्यांची अवस्था तर माहिती आहेच. परंतु, त्यावर येथे नाही तर इतर कुठल्या ठिकाणी बोलता येईल असंही त्या यावेळी म्हणाल्या.