मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद चिघळला; धारावीत तणावपूर्ण स्थिती, शेकडोंचा जमाव रस्त्यावर

  • Written By: Published:
मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद चिघळला; धारावीत तणावपूर्ण स्थिती, शेकडोंचा जमाव रस्त्यावर

Mumbai Dharavi Mosque Violence : मुंबईतील धारावीत सध्या (Violence) तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद सुरु असल्याचं सांगितलं जातय. धारावीत आज सकाळी कारवाईसाठी गेलेल्या बीएमसी पथकाला स्थानिकांनी रोखलं. तसंच, बीएमसी पथकाच्या गाडीचीही तोडफोड केल्याचं समोर आलं आहे. शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरला असून सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.

मोठी बातमी : निवडणुकीआधी घड्याळाचा फैसला करा; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची न्यायालयात याचिका

धारावी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लोक धारावीतील रस्ता अडवून बसले आहेत. त्यांची समजूत घालून पोलिसांनी रस्त्याचा एक भाग वाहतुकीसाठी खुला केला आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. पोलीस लोकांशी चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे.

शिमला मशीद वादाची ठिणगी हिमाचलच्या अनेक भागात पसरली; 4 जिल्ह्यांतील बाजारपेठ आज बंद

नेमकं प्रकरण काय?

धारावीच्या परिसरात एक मशिद आहे. या मिशिदीचा काही भाग अवैध असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे आज मुंबई महानगरपालिकेचं पथक हा अवैध भाग तोडण्यासाठी धारावीत दाखल झाले होते. बीएमसीचं पथक आल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी त्यांना अडवले. तसंच, बीएमसीच्या गाडीच्या काचाही फोडल्या. तसंच, काही नागरिक रस्त्यावर बसले असून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे. लोक धारावीतील रस्ता अडवून बसले आहेत.

खासदार वर्षा गायकवाड यांचं पत्र

काल म्हणजेच 20 सप्टेंबर रोजी स्थानिक खासदार वर्षा गायकवाड यांनी या मशिदीच्या संबंधित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रात धारावीतील हिमालया हॉटेल जवळची मेहबुबे सुभानिया मशिदवरील तोडक कारवाई करण्याची नोटीस मुंबई महानगरपालिकेने पाठवली आहे. सदरची मशिद ही अनेक वर्षापासून अस्तित्वात आहे. धारावी पुनर्वसन प्राधिकरण (DRP) कडून या मशिदीच्या अतिक्रमणाबाबतची चौकशी करावी, सदरहू मशिदीच्या अतिक्रमणाबाबतचा DRP चा चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर पुढील निर्णय घेता येईल, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या