‘तुम्ही कधी उठतात, हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम कारण …’, सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना सुनावलं

‘तुम्ही कधी उठतात, हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम कारण …’, सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना सुनावलं

Supriya Sule On Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पावर (Ajit Pawar) यांनी घोषित केलेल्या लाडकी बहीण योजनेवरून शरद पवार गट आणि अजित पवार गटात आरोप – प्रत्यारोप सुरु आहे. यातच बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करत तुम्ही सकाळी लवकर उठवून कोणावर उपकार करत नाही असा शब्दात टीका केली आहे. खासदार सुप्रिया सुळे पुरंदरमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आज काही लोकांचा एक डायलॉग मी सकाळी लवकर उठतो माझ्यामुळे बंद झाला. कष्ट तर सगळेच करत असतात, कोणी कोणावर उपकार करत नाही. सकाळी लवकर दुधवाला पण उठतो?, तुम्ही किती वाजता उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लम आहे कारण तिला तुमच्यासाठी चहा करायला लागतो. अशी टीका पुरंदरमध्ये बोलताना सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर केली. तसेच आदरणीय शरद पवार (Sharad Pawar) साहेबांनी आजपर्यंत असं कधी भाषण केलं आहे का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आज तुम्ही दिवस – रात्र काम करता असं सांगत आहे मात्र यासाठी आम्ही तुम्हाला आग्रह केला होता का?, तुम्हाला आमदार – खासदार व्हायचं आहे. आज कष्ट तर सगळेच करत आहे, मात्र माझ्यामुळे एक डायलॉग बंद झाला, मी सकाळी उठतो, तुम्ही किती वाजता उठतात हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे, कारण तिला चहा करून द्यावा लागतो. पण पवार साहेबांनी असं कधी भाषण केला आहे का? तुम्ही लवकर उठतो म्हणून दररोज भाषण करत सुटतो का? असा सवाल देखील सुप्रिया सुळेंनी विचारला. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार मी सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करतो, असे वक्तव्य माध्यमात करत आहे .

आज पुरंदरमध्ये बोलताना सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. तसेच यावेळी सुप्रिया सुळे यांनी इंदापूरचे आमदार दत्तामामा भरणे यांच्यावर देखील भाष्य केले.

राजकारणातले टर्न! ‘खुर्ची’ गेली, नेत्यांनी पक्षच सोडला; काहींनी सुरू केली नवी इनिंग..

सुप्रिया सुळे म्हणाले की, या मतदारसंघात 5 हजार कोटी रुपयांची विकासकामे झाली असं आमदार दत्तामामा भरणे सांगत आहे. हा आकडा म्हणजे काही विनोदी नाही. मला एका कोटीमध्ये शून्य किती असतात ते माहिती नाही. सत्ता येत असते आणि जात असते. मात्र, तुम्ही लोकांचा विचार कधी करणार, प्रत्येकजण आपापल्या परीने काम करत असतो असेही यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube