Download App

2026 टी-20 विश्वचषकातून ऋषभ पंतला मिळणार डच्चू, ‘हे’ विकेटकीपर फलंदाज घेणार जागा?

T20 World Cup 2026 :  टी-20 विश्वचषक 2024 मध्ये शानदार कामगिरी करत भारतीय संघाने बाजी मारली होती तर आता 2026 मध्ये देखील पुन्हा

  • Written By: Last Updated:

T20 World Cup 2026 :  टी-20 विश्वचषक 2024 मध्ये शानदार कामगिरी करत भारतीय संघाने बाजी मारली होती तर आता 2026 मध्ये देखील पुन्हा एकदा शानदार कामगिरी करण्यासाठी भारतीय संघ तयार होताना दिसत आहे. 2026 च्या विश्वचषकसाठी (T20 World Cup 2026) भारतीय संघाने तयारी देखील सुरु केली आहे. बीसीसीआयकडून (BCCI) आतापासूनच 2026 च्या विश्वचषकासाठी संघ तयार करण्यात येत आहे. 2026 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली  टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धा होणार आहे. मात्र या स्पर्धेत भारतीय संघात (Team India) विकेटकीपर कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. याचा मुख्य कारण म्हणजे भारताचा मुख्य विकेटकीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) चांगल्या फॉर्मात नाही. त्यामुळे त्याची जागा कोण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.सध्या भारताकडे तीन विकेटकीपर फलंदाज असे आहे की जे या विश्वचषकात ऋषभ पंताची जागा घेऊ शकतात.

केएल राहुल

2026 च्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघात ऋषभ पंतच्या (KL Rahul) जागेसाठी केएल राहुल हा सर्वात मोठा धोका ठरेल. 2026 च्या टी-20 विश्वचषकात विकेटकीपर फलंदाज म्हणून केएल राहुल पहिली पसंती असू शकतो. केएल राहुल मधल्या फळीतील देखील फलंदाज करु शकतो. 2026 च्या टी-20 विश्वचषकात केएल राहुल भारतासाठी नंबर-3 वर फलंदाजी करण्यासोबतच यष्टीरक्षकाची भूमिका बजावू शकतो.

संजू सॅमसन

भारताचा आणखी एक स्फोटक विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) . संजू  मधल्या फळीत किंवा सलामीला फलंदाजी करताना मोठे फटके मारतो. त्यामुळे संजू सॅमसन 2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी विकेटकीपर फलंदाज म्हणूनही आपले स्थान पक्के करू शकतो. 2026 च्या टी-20 विश्वचषकात, संजू सॅमसन भारतासाठी विकेटकीपिंगसोबतच सलामीवीराची भूमिका बजावू शकतो.

मानहानीच्या प्रकरणात खासदार साकेत गोखले अडचणीत, उच्च न्यायालयाने दिले वेतन जप्त करण्याचे आदेश

इशान किशन

इशान किशन (Ishan Kishan) देखील 2026 च्या विश्वचषकच्या शर्यतीत आहे. इशान किशनने आतापर्यंत भारतीय संघासाठी 27 एकदिवसीय आणि 32 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. याशिवाय इशान किशनने 2 कसोटी सामनेही खेळले आहेत. इशान किशनची प्रतिभा लक्षात घेता, त्याला 2026 च्या टी-20 विश्वचषकात संधी मिळू शकते.

follow us