Download App

Melbourne Test : सुमार कामगिरी भोवणार; ‘या’ तीन भारतीय खेळाडूंचा संघातून पत्ता कट होणार ?

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर Team India चांगले प्रदर्शन करू शकला नाही. त्यामुळे मेलबर्न कसोटीतून अनेक खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

  • Written By: Last Updated:

3 Big Players Could Be Dropped From Team India Playing 11, Melbourne Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावस्कर (Border–Gavaskar Trophy) कसोटी मालिका सुरू आहे. पाच सामन्यांची मालिका आहे. चौथा सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये (Melbourne Test) खेळविण्यात येणार आहे. ही बॉक्सिंग डे कसोटी असल्याने क्रिकेट रसिकांचे लक्ष हे या सामन्याकडे राहणार आहे. या मालिकेत दोन्ही संघ बरोबरीत आहे. तर तिसरा सामना ड्रा (अनिर्णित) झाला आहे. तिसऱ्या सामन्यात पावसाचा खेळ झाला. या सामन्यात भारताचा (Team India) खेळ चांगला झाला पण पावसामुळे हा रद्दा झाला. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर भारतीय संघ चांगले प्रदर्शन करू शकला नाही. त्यामुळे मेलबर्न कसोटीतून अनेक खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

बॉर्डर गावस्करचा अखेरचा सामना खास, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची उपस्थिती

मोहम्मद सिराज
संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने ब्रिस्बेन कसोटीच आक्रमक गोलंदाजी केली. पण तो ज्यादा विकेट घेऊ शकला नाही. पहिल्या डावात तो केवळ दोनच विकेट घेऊ शकला. जसप्रीत बुमराहला तो जास्त सपोर्ट करू शकला नाही. तिसऱ्या कसोटीत त्याने चांगली गोलंदाजी केलीय. परंतु चौथ्या सामना जिंकण्यासाठी कर्णधार हा वेगळा गोलंदाज संघात घेऊ शकते. त्यामुळे संघातून मोहम्मद सिराजचा पत्ता कट होऊ शकतो.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर

शुभमन गिल
या मालिकेत शुभमन गिलने मोठी निराशा केलीय. ब्रिस्बेन कसोटीत तो खास काही करू शकला नाही. तो केवळ एक धाव करू शकला. त्यापूर्वीच्या सामन्यांमध्ये त्याची कामगिरी निराशाजनकच झाली आहे. त्यामुळे त्याला संघातून डच्चू दिला जाऊ शकतो. त्याएेवजी ध्रुव जुरेलला संधी दिली जाऊ शकते. त्याला संधी दिल्यास तो चांगले प्रदर्शन करू शकतो.

यशस्वी जैस्वाल
सलामीचा फलंदाज यशस्वी जैस्वाल हा पूर्ण मालिकेत फ्लॉप ठरला आहे. त्याला मिचेल स्टॉर्क सहजपणे बाद करत आहे. यशस्वी जैस्वाल हा चांगली सुरुवात करून देऊ शकला नाही. त्यामुळे त्याला संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याची जागा अभिमन्यू ईस्वरन हा घेऊ शकतो. घरगुती क्रिकेटमध्ये अभिमन्यू ईस्वरनने जोरदार धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

follow us