Ind Vs Nz : निर्णायक सामन्यात न्यूझीलंडसमोर 235 धावांचा डोंगर

भारताने न्यूझीलंडसमोर 235 धावांचं आव्हान ठेवलं असून या निर्णायक सामन्यात भारताचा फलंदाज शुभमन गिलने शानदार शतक ठोकलं आहे. अहमदाबादच्या नरेंद्र स्टेडियमवर भारत-न्यूझीलंडमध्ये तिसरा टी20 सामना रंगला आहे. या सामन्यादरम्यान, युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने अवघ्या काही चेंडूतच शानदार शतक केल्याचं पाहायला मिळालंय. विशेष म्हणजे गिलने न्यूझीलंडविरुध्दच्या तीन एकदिवसीय सामन्यात एक शतक त्यानंतर द्विशतक आता टी20 […]

Untitled Design (61)

Untitled Design (61)

भारताने न्यूझीलंडसमोर 235 धावांचं आव्हान ठेवलं असून या निर्णायक सामन्यात भारताचा फलंदाज शुभमन गिलने शानदार शतक ठोकलं आहे. अहमदाबादच्या नरेंद्र स्टेडियमवर भारत-न्यूझीलंडमध्ये तिसरा टी20 सामना रंगला आहे.

या सामन्यादरम्यान, युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने अवघ्या काही चेंडूतच शानदार शतक केल्याचं पाहायला मिळालंय. विशेष म्हणजे गिलने न्यूझीलंडविरुध्दच्या तीन एकदिवसीय सामन्यात एक शतक त्यानंतर द्विशतक आता टी20 मालिकेमध्येही गिलने एक शतक पूर्ण केलं आहे.

शुभमनने 54 चेंडूमध्ये आपलं शतक पूर्ण केलंय. हार्दीक पांड्या आणि शुभमनच्या दमदार खेळीने भारताने न्यूझीलंडसमोर 20 षटकांत 235 धावांचा डोंगर उभा केला आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताचे 4 फलंदाजांना तंबूत पाठवलंय.

तर दुसरीकडे युवा सलामीवीर शुभमन गिल आणि हार्दीक पांड्या तुफान फलंदाजीने भारताला 235 धावांपर्यंत पोहचवले आहे. हा सामना जो संघ जिंकणार तोच संघ ही मालिका जिंकणार आहे.

दरम्यान, न्यूझीलंड आणि भारताच्या संघातील दमदार खेळाडूंमुळे हा सामना चांगलाच रंगणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अखेर भारताला हा सामना जिंकण्यासाठी आपल्या गोलंदाजीवर पकड ठेवावी लागणार आहे.

Exit mobile version