ICC ODI Rankings : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया कपचे विजेतेपद पटकावले. भारताने विजेतेपदाच्या लढतीत श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला. मात्र या विजयानंतरही भारताला आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान संघ पुन्हा एकदा वनडेमधला नंबर वन संघ बनला आहे.
आशिया चषकाच्या सुपर-4मध्ये तळाला असलेल्या पाकिस्तानने आयसीसी क्रमवारीत मोठी मजल मारली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा पाकिस्तानला मोठा फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात आफ्रिकेने 122 धावांनी शानदार विजय नोंदवला आणि पहिल्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला वनडे क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर ढकलले. यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा वनडेमध्ये नंबर वन संघ बनण्यात यशस्वी झाला.
भारत होऊ शकतो नंबर वन
आयसीसी वनडे क्रमवारीत टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचे रँकिंग 114.659 आहे. तर पहिल्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तान संघाचे रेटिंग 114.889 आहे. आशिया चषकानंतर टीम इंडिया 22 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मायदेशात मालिका खेळणार आहे. या मालिकेद्वारे भारतीय संघ अव्वल स्थान गाठू शकतो. त्याचबरोबर या मालिकेद्वारे ऑस्ट्रेलिया संघ पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर येऊ शकतो.
Photos : फक्त मराठी सिने सन्मान सोहळा दिमाखात संपन्न
अशी आहे क्रमवारी
पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ 113 रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिका 106 रेटिंगसह चौथ्या आणि इंग्लंड 105 रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे.
India and Australia both have a chance to regain the top spot in the @MRFWorldwide ICC Men’s ODI Team Rankings when they face-off later this week.
More ➡️ https://t.co/mIT7iCarHq pic.twitter.com/7GfIMJXvBZ
— ICC (@ICC) September 18, 2023
कसोटी आणि टी-20 मध्ये भारत नंबर वन
उल्लेखनीय आहे की भारतीय संघ ICC कसोटी आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाला टेस्टमध्ये 118 तर आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 264 रेटिंग आहे.