Download App

WTC Final: अजिंक्य रहाणेने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर, दणक्यात पुनरागमन, सर्वांची बोलती बंद

  • Written By: Last Updated:

WTC Final: अजिंक्य रहाणेसाठी आयपीएल 2023 चा हंगाम चांगला होता. याच कारणामुळे अजिंक्य रहाणे तब्बल 18 महिन्यांनंतर भारतीय कसोटी संघात परतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी अजिंक्य रहाणेचा (Ajinkya Rahane) संघात समावेश करण्यात आला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचे बहुतांश फलंदाज संघर्ष करताना दिसले, पण अजिंक्य रहाणेने सहज धावा केल्या.(ajinkya-rahane-century-in-ind-vs-aus-wtc-final-at-oval-here-know-complete-news-in-details)

अजिंक्य रहाणे 18 महिन्यांनंतर संघात परतला, शानदार खेळी खेळली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये अजिंक्य रहाणेने शानदार खेळी केली. मात्र, शतक पूर्ण करण्यात तो हुकला. अजिंक्य रहाणे 129 चेंडूत 89 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत 11 चौकार आणि 1 षटकार लगावला. याशिवाय अजिंक्य रहाणेने आणखी एक मोठा आकडा पार केला आहे. वास्तविक या खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये 5 हजार धावांचा आकडा गाठला आहे.

Champions Trophy 2025: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का, चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद जाणार

अजिंक्य रहाणेने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी अजिंक्य रहाणेची निवड झाली तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. भारतीय निवड समितीच्या निर्णयावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते, मात्र आता या मधल्या फळीतील फलंदाजाने आपल्या खेळाने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे टीम इंडियाचे फलंदाज स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले, पण अजिंक्य रहाणेने सहजासहजी हार मानली नाही आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा खंबीरपणे सामना केला.

अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांनी टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले

152 धावांच्या स्कोअरवर केएस भरतच्या रूपाने भारतीय संघाला सहावा धक्का बसला. केएस भरत पॅव्हेलियनमध्ये परतला, त्यावेळी टीम इंडियाला फॉलोऑन टाळण्यासाठी 118 धावा करायच्या होत्या. भारतीय चाहत्यांच्या आशा अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूरवर विसावली आहेत. त्याचबरोबर या दोन्ही खेळाडूंनी निराश केले नाही. अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांच्यात सातव्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी झाली.

Tags

follow us