Download App

Ashes Series: थरारक सामन्यात कांगारू ठरले भारी, कमिन्स-लायन विजयाचे शिल्पकार

  • Written By: Last Updated:

England vs Australia, 1st Test: अॅशेस मालिकेतील पहिला कसोटी सामन्यात कर्णधार पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांच्या झंझावती फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने थरारक विजय मिळवला आहे. इंग्लंडने दिलेल्या 281 धावांच्या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने दोन विकेट राखून केला. या विजयासह यासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

इंग्लंडने पहिला डाव 393 धावांवर घोषित केला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 386 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात इंग्लंडने 273 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर 281 धावांचे लक्ष्य ठेवले होते. कमिन्स-लायन यांच्या झंझावती फलंदाजीच्या जोरावर दोन गडी राखून पूर्ण केले.

‘मी मोदींचा फॅन’ एलॉन मस्कने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

281 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने एका टप्प्यावर 227 धावांत आठ विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर इंग्लंड हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांनी यानंतर विकेट पडू दिली नाही आणि इंग्लंडचे मनसुबे उधळले. कमिन्स 44 आणि लियॉन 16 धावा करून नाबाद परतले. दोघांनी 9 व्या विकेटसाठी 54 धावांची मॅचविनिंग पार्टनरशिप केली.

ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने दोन्ही डावात चमकदार कामगिरी केली. पहिल्या डावात 141 धावा करणाऱ्या ख्वाजाने दुसऱ्या डावात 197 चेंडूत 65 धावा केल्या. त्याच्या चमकदार कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

Tags

follow us