IND Vs ENG : टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) राजकोट कसोटीत (IND Vs ENG) इतिहास रचला आहे. अश्विनने कसोटीत 500 विकेटचा टप्पा गाठला आहे. अश्विनने 98 सामन्यात 500 विकेट घेण्याचा पराक्रम केला. त्याने इंग्लिश फलंदाज जॅक क्रॉलीला बाद करून कसोटीत ही कामगिरी केली. अशाप्रकारे कसोटीत 500 विकेट घेणारा अश्विन दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी भारताचा माजी लेगस्पिनर अनिल कुंबळेने ही कामगिरी केली होती.
त्याचबरोबर कसोटीत 500 विकेट घेणारा तो 9वा गोलंदाज ठरला आहे. कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर आहे. मुथय्या मुरलीधरनच्या नावावर 800 कसोटी विकेट आहेत.
“मला काम आवडले नव्हते पण…”, रजनीकांतच्या ‘पेटा’ सिनेमाबद्दल अभिनेत्याने व्यक्त केली खंत
यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज शेन वॉर्न दुसऱ्या स्थानावर आहे. शेन वॉर्नच्या नावावर 145 कसोटी सामन्यांमध्ये 708 विकेट आहेत. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर जिमी अँडरसन तर चौथ्या क्रमांकावर अनिल कुंबळे आहे. जिमी अँडरसन आणि अनिल कुंबळे यांच्या नावे अनुक्रमे 695 आणि 619 विकेट आहेत. यानंतर या यादीत स्टुअर्ट ब्रॉड, ग्लेन मॅकग्रा, कोर्टनी वॉल्श आणि नॅथन लायन यांच्या नावांचा समावेश आहे.
ऋषी सुनक यांना पोटनिवडणुकीत मोठा धक्का, दोन जागांवर दारुण पराभव
अश्विनची कसोटी कारकीर्द
आर अश्विनच्या कसोटी कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने 98 सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याने 500 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी सामन्यात 23.89 च्या सरासरीने आणि 51.45 च्या स्ट्राईक रेटने विकेट घेतल्या आहेत. त्याने कसोटी सामन्यात 34 वेळा एका डावात 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. याशिवाय त्याने 8 वेळा सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत.