आशिया कप 2023 ची तारीख जाहीर झाली आहे. 31 ऑगस्टपासून आयोजित करण्यात येणार आहे. या घोषणेसोबतच टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर लवकरच मैदानात परतू शकतात. हे दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहेत. एका रिपोर्टनुसार अय्यर आणि बुमराह आशिया कपसाठी भारतीय संघात स्थान मिळवू शकतात. या दोघांची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेस टेस्ट होणार आहे. (asia-cup-2023-jasprit-bumrah-shreyas-iyer-may-will-come-back-for-team-india)
दुखापतीनंतर बुमराह आणि अय्यरवर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. यामुळे हे दोन्ही खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी टीम इंडियाचा भाग नव्हते. बुमराह देखील आयपीएल 2023 मधून बाहेर होता. क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे वैद्यकीय कर्मचारी या दोन्ही खेळाडूंची तपासणी करणार आहेत. बुमराहच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली आहे. यासाठी तो मार्चमध्ये न्यूझीलंडला गेला होता. बुमराहची सध्या फिजिओथेरपी सुरू आहे.
Asia Cup चे वेळापत्रक जाहीर; पाकिस्तानला मोठा झटका, श्रीलंकेची बल्ले बल्ले
श्रेयस अय्यरही पाठीच्या समस्येमुळे बाहेर आहे. अय्यर याच्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. श्रेयसही बुमराहप्रमाणे फिजिओथेरपी घेत आहे. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना मार्च 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना खेळला होता. तेव्हापासून तो टीम इंडियात पुनरागमन करू शकला नाही. तसेच तो आयपीएल 2023 मध्ये खेळू शकला नाही. मात्र आता तो लवकरच मैदानात परतण्याची शक्यता आहे.
टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतही दुखापतीमुळे बाहेर आहे. तो रिकव्हरी मोडवर देखील आहेत. रिषभने नुकतेच इंस्टाग्रामवर त्याच्या रिकव्हरीचे अपडेट शेअर केले आहे. दुखापतीमुळे पंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्येही सहभागी झाला नव्हता.