Asia Cup 2023: यंदाच्या आशिया कप (Asia Cup) मधील सामने पाकिस्तानमध्ये खेळण्यास भारतीय संघाने नकार दिला आहे. पाकिस्तानमधील सुरक्षेचे कारण बीसीसीआयने (BCCI) दिले आहे. तर काही सामने दुसऱ्या देशात खेळविण्याचे हायब्रीड मॉडेलचा पर्याय ठेवण्यात आला होता. परंतु श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान संघानेही प्रस्तावित हायब्रिड मॉडेलला नकार दिला आहे. त्यामुळे यजमान पाकिस्तान सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कप स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता आहे. (asia-cup-pakistan-team-will-be-out-pcb-bcci)
सुरक्षेच्या कारणास्तव भारताने पाकिस्तान दौरा करण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख नजन सेठी यांनी हायब्रीड मॉडेलची कल्पना मांडली आहे. या मॉडेलनुसार आशिया कपमधील पाकिस्तानचे तीन किंवा चार सामने मायदेशात खेळेल. तर भारतीय संघाबरोबरचे सामने दुसऱ्या देशात खेळविले जाऊ शकतात, असा पीसीबीचा पर्याय आहे. आता श्रीलंका, बांगलादेश अफगाणिस्तान या संघाने हायब्रीड मॉडेलला विरोध दर्शविला आहे. यावरून हे संघही आता पाकिस्तानमध्ये खेळण्यास इच्छूक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये ही स्पर्धा आता होऊ शकत नाही.
ISSF Junior World Cup : भारतीय नेमबाज धनुष श्रीकांतनं जिंकलं सुवर्णपदक…
आता एशियन क्रिकेट कौन्सिलच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य भेटणार ही केवळ औपचारिकता आहे. परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आता माहीत आहे की श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान आशिया कपसाठी त्यांच्या प्रस्तावित हायब्रिड मॉडेलला समर्थन देत नाही. ही स्पर्धा पाकिस्तानऐवजी दुसऱ्या देशात आयोजित केल्यास पाक संघ स्पर्धेत भाग घेणार नसल्याचे पीसीबीचे प्रमुख सेठी वारंवार सांगत आहेत.
Wrestlers Protest : शाहंच्या भेटीनंतर कुस्तीपटूंनी आंदोलन गुंडाळले? कामावर परतलेली साक्षी मलिक म्हणाली…
तर पीसीबी आशिया कपवर बहिष्कार टाकू शकते, असे वृत्त आहे. तर एसीसीच्या एका सूत्राने सांगितले, की पाकिस्तानकडे फक्त दोनच पर्याय आहेत. तटस्थ ठिकाणी स्पर्धा खेळविणे किंवा स्पर्धेतून माघार घेणे. पाकिस्तान संघ खेळला नाहीतरी त्याला आशिया चषक म्हटले जाईल. पण आशिया चषकातील सामन्यांचे प्रसारणाचे हक्क असलेले प्रसारक पाकिस्तानच्या अनुपस्थितीत करारावर पुन्हा चर्चा असे म्हटले आहे.
श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, भारत या सर्व संघांनी पाकिस्तान तसेच इतर कोणत्याही देशात आशिया कप आयोजित करणे तार्किक किंवा आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याचे म्हटले आहे. तो श्रीलंका या एकाच देशात आयोजित केला जावा अशी भूमिका या संघांची आहे.
या परिस्थितीत यंदाचा आशिया कप पूर्णपणे रद्द होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वर्ल्डकपपूर्वी भारत, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघ 50 षटकांच्या स्वरूपात बहु-सांघिक स्पर्धा खेळू शकतात. या वर्षी आशिया कप होणार नाही, अशी सर्व शक्यता आहे. सामन्यांबरोबर ब्रॉडकास्टर्सचे काही मुद्दे आहेत.