ISSF Junior World Cup : भारतीय नेमबाज धनुष श्रीकांतनं जिंकलं सुवर्णपदक…
ISSF Junior World Cup : जर्मनीमध्ये सुरु असलेल्या ISSF ज्युनिअर वर्ल्ड कपमध्ये भारताच्या खेळाडूने सुवर्णपदक पटकावलं आहे. भारतीय नेमबाज धनुष श्रीकांतने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये भारताची मान उंचावली आहे. (Indian shooter Dhanush Srikanth wins gold in men 10m air rifle event in ISSF Junior World Cup in Germany)
Telangana lad Dhanush Srikant Wins Gold in the Junior World Cup in Germany and is the only Double deaf Olympic 🥇 🥇 Medallist in the state . He cannot hear and speak ..What an outstanding achievement.@TelanganaCMO @KTRBRS @VSrinivasGoud pic.twitter.com/REat1o7rMl
— Gagan Narang (@gaGunNarang) June 5, 2023
धनुष श्रीकांतने सुवर्णपदक पटकावल्याने भारताच्या सुवर्णपदकांची संख्या आता तीनवर पोहचली आहे. तर एक सिल्व्हर आणि दोन ब्रॉन्झ पदकं भारताच्या नावावर आहेत, अशी एकूण सहा पदकं भारतानं कमावली आहेत.
Indian shooter Dhanush Srikanth wins gold in men's 10m air rifle event in ISSF Junior World Cup in Germany
— Press Trust of India (@PTI_News) June 5, 2023
शिरसाटांनी सांगितला मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त; ‘या’ तारखेच्या आत होणार मंत्री
तेलंगणाचा रहिवासी असलेला धनुष मुकबधिर आहे. जर्मनीच्या सुहल इथं सुरु स्पर्धेत त्याने तिसऱ्या दिवशी सुवर्ण पदक पटकावलं आहे. तेलंगाणामधील तो पहिलाच दोनदा सुवर्णपदकं जिकणारा खेळाडू ठरला आहे.