Asia Cup चे वेळापत्रक जाहीर; पाकिस्तानला मोठा झटका, श्रीलंकेची बल्ले बल्ले

Asia Cup 2023 आशिया चषक स्पर्धेबाबत मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद आता पूर्णपणे मिटला आहे. नवीन वेळापत्रकाप्रमाणे हा चषक आता 2 देशांमध्ये आयोजित केला जाणार आहे. यातील पाकिस्तानमध्ये 4 सामने होणार आहेत. तर उर्वरित 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत. 31 ऑगस्टपासून स्पर्धेची सुरूवात होणार असून 17 सप्टेंबरला अंतिम सामना होणार आहे. यापूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे आशिया […]

Untitled Design 2023 06 12T141553.350

Untitled Design 2023 06 12T141553.350

Asia Cup 2023

आशिया चषक स्पर्धेबाबत मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद आता पूर्णपणे मिटला आहे. नवीन वेळापत्रकाप्रमाणे हा चषक आता 2 देशांमध्ये आयोजित केला जाणार आहे. यातील पाकिस्तानमध्ये 4 सामने होणार आहेत. तर उर्वरित 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत. 31 ऑगस्टपासून स्पर्धेची सुरूवात होणार असून 17 सप्टेंबरला अंतिम सामना होणार आहे.

यापूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे आशिया चषकाचे यंदाचे यजमनापद पाकिस्तानकडे होते. मात्र भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी नकार दिल्यानंतर बराच काळ वाद सुरू होता. एका टप्प्यावर स्पर्धा होणार की नाही यावरच प्रश्न चिन्ह उभे राहिले होते. त्यावर संयुक्त अरब अमिरात सारख्या तटस्थ ठिकाणी आयोजन करण्यावरही चर्चा झाली. मात्र त्यावर आता तोडगा निघाला आहे.

यानुसार यंदाच्या आशिया चषकात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ असे सहा संघ सहभागी होणार असून हे 2 गटात विभागले जाणार आहेत. या सर्वांचे मिळून एकूण 13 सामने होणार. त्यापैकी चार सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जाणार आहेत. तर उर्वरित 9 सामने श्रीलंकेत होणार. (asia-cup-2023-will-start-from-31st-august-hosted-with-hybrid-model-ind-vs-pak)

आशियाई क्रिकेट परिषदेने ट्विट करून स्पर्धेच्या तारखेची माहिती दिली आहे. परिषदेने अधिकृत संकेतस्थळावरही याबाबत माहिती दिली आहे. मात्र सामन्यांचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत असतील. या दोन्ही संघांमध्ये अनेक दिवसांपासून द्विपक्षीय मालिका खेळली जात नाही. हे संघ फक्त आयसीसी स्पर्धा किंवा आशिया कपमध्येच आमनेसामने येतात.

Exit mobile version