Download App

पाच एआय प्लॅटफॉर्मची मोठी भविष्यवाणी! ‘ही’ टीम होणार आशिया कप चॅम्पियन…

आशिया कपची घोषणा झाल्यानंतर एआईच्या पाच प्लॅटफॉर्मने मोठी भविष्यवाणी केली असून आशिया कपच्या चॅम्पियन संघाचीही घोषणा केलीयं.

Asia Cup : आशिया कप 2025 (Asia Cup) ची घोषणा झाली असून दुसऱ्या दिवशी टीम शुभमन गिल संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध खेळणार आहे. यादरम्यान, माजी दिग्गज क्रिकेटपट्टू आपापल्या संघाची निवड करीत आहेत. तर दुसरीकडे संभावित विजेता संघाचीही भविष्यवाणी केली जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडून आशिया चॅम्पियन संघाची घोषणा करण्यात आलीयं. भारत यंदाचा आशिया कप चॅम्पियन होणार असल्याची घोषणा करण्यात आलीयं.

या चषकाचा अंतिम सामना भारत विरुद्ध पाकिस्तान होणार असल्याचाही दावा केला जात आहे. तर काहींकडून अफगाणिस्तान अंतिम सामन्यात पोहोचणार असल्याचा दावा केला जात आहे. यासंदर्भात संविस्तर माहिती पाहूयात..

11

“जनसुरक्षा विधेयक मागे घ्या, आम्ही सरकारला..”, खा. सुप्रिया सुळेंचा महायुतीला इशारा

चॅट जीपीटीने भारताला विजयी संघ घोषित केलं असून त्यानुसार भारतीय संघात शुभमन गिल आहे. मात्र पाकिस्तान संघात सर्वश्रेष्ठ फलंदाज बाबर आजम संघात सामिल नसल्याचं सांगण्यात येत आहे. दुसऱ्या एका प्लॅटफॉर्म क्लाउडनेही भारताला आशिया कपचा विजेता म्हणून घोषित केले आहे. अंतिम फेरीत भारताचा सामना शेजारील पाकिस्तानशी होईल. क्लाउडच्या या भाकितामुळे दोन्ही देशांचे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झालीयं.

12

को-पायलटचा अंदाज : को-पायलटचा अंदाज खूप मनोरंजक आहे. को-पायलटने भारताला विजेता आणि अफगाणिस्तानला उपविजेते म्हणून घोषित केले आहे. हे मनोरंजक आहे कारण त्याचा प्लेअर ऑफ द टूर्नामेंट, टॉप रन स्कोअरर आणि टॉप विकेट घेणारे हे सर्व भारतीय आहेत.

भावी पंतप्रधान? कोण आहे इंजिनिअर आणि मग रॅपर झालेला Gen Z चा नेता बालेन शहा?

13

GROK चा विजेता : आजकाल GROK प्लॅटफॉर्म सोशल मीडियावर वेगाने ओळख मिळवत आहे. तरुणांना ते खूप आवडते कारण ते X शी संबंधित आहे. म्हणून चाहत्यांनी आशिया कपचा विजेता कोण असेल असा प्रश्न देखील विचारला आहे.

14

जेमिनीची भविष्यवाणी : जेमिनी एआय हे आणखी एक प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मने केवळ भारताचा विजेता म्हणून अंदाज वर्तवला नाही तर पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचेल असे भाकीत केले आहे. या प्लॅटफॉर्मने भारतीयांवर प्लेअर ऑफ द टूर्नामेंट, बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट आणि बॉलर ऑफ द टूर्नामेंटसाठी पैज लावली आहे.

follow us