Asia Cup 2025 : अँडरसन – तेंडुलकर ट्रॉफीनंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आशिया कप 2025 (Asia Cup 2025) कडे लागले आहे. लवकरच या स्पर्धेसाठी बीसीसीआयकडून (BCCI) भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. माहितीनुसार, बीसीसीआय ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आशिया कप 2025 साठी भारतीय संघाची घोषणा करु शकतो. या स्पर्धेसाठी भारतीय संघात कोणाला संधी मिळणार याबाबत सध्या सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, या स्पर्धेसाठी भारतीय संघात यशस्वी जयस्वालसह (Yashasvi Jaiswal) शुभमन गिल (Shubman Gill) आणि साई सुदर्शनला (Sai Sudarshan) संधी मिळू शकते. नुकतंच इंग्लंडविरुद्ध झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर तिन्ही खेळाडूंना एक महिन्याचा ब्रेक मिळणार आहे. त्यामुळे तिन्ही खेळाडू निवडीसाठी उपलब्ध राहणार आहे. तर दुसरीकडे भारतीय निवड समिती सर्व शक्यता लक्षात घेऊन संघाची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
जर भारत 28 सप्टेंबर रोजी आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचला तर त्यानंतर फक्त चार दिवसांनी 2 ऑक्टोबरपासून वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे खेळाडूंचे वर्कलोड मॅनेजमेंट करणे बीसीसीआयकडे मोठे आव्हान असणार आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘संजू सॅमसन (Sanju Samson) आणि अभिषेक शर्मा उत्तम फॉर्ममध्ये आहेत, परंतु पाच आठवड्यांचा ब्रेक आणि टॉप ऑर्डरची स्थिरता पाहता, जयस्वाल, गिल आणि सुदर्शन यांना प्राधान्य दिले जाऊ शकते.
टॉप ऑर्डरसाठी मोठी जबाबदारी
आशिया कप युएईमध्ये खेळला जाईल, जिथे खेळपट्ट्या संथ आणि फिरकीला अनुकूल मानल्या जातात. तसेच, पुढील सहा महिन्यांत होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर, निवडकर्त्यांना असे फलंदाज हवे आहेत जे परदेशी परिस्थितीत संघाला चांगली सुरुवात देऊ शकतील.त्यामुळे जयस्वाल, गिल आणि सुदर्शन हे सर्वच प्रबळ दावेदार आहेत.
लाडकी बहीण योजना : सरकार ॲक्शन मोडमध्ये, ‘या’ लोकांकडून वसूल करणार 16 हजार 500 रुपये
बुमराह-सिराजचे पुनरागमन फिटनेसवर
तर दुसरीकडे भारतीय संघाचे स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांची निवड फिटनेस टेस्टवर अवलंबून असणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही महिन्यांत दोघांचाही वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये काळजीपूर्वक वापर करण्यात आला आहे.