Download App

Asian Champions Trophy 2023 : जपानचा 5-0 ने धुव्वा उडवत भारत ‘फायनल’मध्ये; मलेशियाशी होणार लढत

  • Written By: Last Updated:

India vs Japan : एशियन चॅम्पनशिप ट्रॉफीच्या उपांत्यफेरीत भारताने जपानचा मोठा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने जपानचा तब्बल 5-0 ने धुव्वा उडविला आहे. भारत आता उद्या अंतिम सामना मलेशियासोबत खेळणार आहे. तर या विजयाबरोबरच भारताने 2021 मधील एशियन चॅम्पनशिप ट्रॉफीतील उपांत्यफेरीचा पराभवाचा वचपाही काढला आहे. (Asian Champions Trophy 2023 India defect Japan 5-0)

पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांचा एकही गोल झाला नाही. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताच्या खेळाडूने सलग तीन गोल डागले. त्यामुळे भारत 3-0 आघाडीवर होता. त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये एक आणि चौथ्या क्वार्टरमध्ये एक असे दोन गोल डागले. त्यामुळे भारताने 5-0 ने सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

‘मी दिवाळखोर झालोयं’; ‘काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचं मोठं विधान…

पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघाला एकही गोल करता आला नाही. भारताला सामन्याच्या पहिल्या दोन मिनिटात पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. परंतु कर्णधार हरमनप्रीत सिंग हा गोल करू शकला नाही. त्यानंतर भारतीय संघाने जोरदार प्रयत्न केले. परंतु यश मिळाले नाहीत. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने खाते उघडले. 19 व्या मिनिटाला आकाशदीपने गोल करत भारताला 1-0ची आघाडी मिळवून दिली.

नवाब मलिकांना जामीन मिळताच सुप्रिया सुळेंचा सरकारवर गंभीर आरोप

कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल केल्याने भारताची आघाडी दोन गोलने झाली होती. तर याच क्वार्टरमध्ये मनदीप सिंगने गोल केल्याने भारताची 3-0 आघाडी झाली होती. सुरुवातीपासून भारतीय संघाने आघाडी घेतल्याने जपान पराभवाकडे लोटला गेला होता. तिसऱ्या क्वार्टरमध्ये सुमीने चौथा गेल केला. त्यानंतर कार्थी सेल्वमने पाचवा गोल केला. त्यामुळे भारताने हा सामना सहजपणे जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

Tags

follow us