Download App

Asian Games 2023: टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जखमी, उमरान मलिक घेणार जागा

Shivam Mavi injured : भारतीय क्रिकेट टीमचे पुरुष आणि महिला दोन्ही संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळणार आहेत. चीनमध्ये होणार्‍या या मेगा इव्हेंटचे आयोजन 19 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. या मेगा स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी भारतीय पुरुष क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. BCCI ने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी युवा संघ निवडला आहे. या संघाचे नेतृत्व रुतुराज गायकवाड करत आहेत.

भारतीय टीममध्ये अनेक युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या संघाचा भाग असलेला वेगवान गोलंदाज शिवम मावीला दुखापत झाल्याचे वृत्त आहे. पाठीच्या दुखापतीमुळे तो आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संघातून बाहेर जाऊ शकतो. अशा स्थितीत उमरान मलिकचा त्याच्या जागी संघात समावेश केला जाऊ शकतो.

आता घरबसल्या करा एसटी बसचे बुकिंग, IRCTC ने केली मोठी घोषणा

VVS लक्ष्मण आशियाई क्रीडा 2023 साठी भारतीय पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावणार आहे. भारत आपला पहिला सामना 3 ऑक्टोबर रोजी थेट क्वार्टर फायनल खेळेल आणि तो जिंकल्यानंतर, संघ 5 ऑक्टोबर रोजी सेमीफायनल खेळेल. तर या स्पर्धेचा अंतिम सामना 7 ऑक्टोबरला होणार आहे.

Marine Department Exam : परीक्षा केंद्रात नाहीतर हॉटेलमध्ये बसून दिली परीक्षा; 22 जणांवर गुन्हा

पुरुष संघ:
रुतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम कुमार, शिवम दुबे.

राखीव खेळाडू – साई किशोर, व्यंकटेश अय्यर, साई सुदर्शन, दीपक हुडा, यश ठाकूर.

Tags

follow us