IND vs IRAN Kabaddi : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतच कबड्डीचा बादशहा! इराणचा पराभव करत सुवर्ण कामगिरी…

India vs Iran Kabaddi Final, Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023)भारत विरुद्ध इराण (India vs Iran Kabaddi Final)असा कबड्डी सामना झाला. भारतीय कबड्डी संघानं हा सामना जिंकून सुवर्णपदक (Gold Medal)पटकावलं आहे. या सामन्यात मोठा वाद झाल्याचा पाहायला मिळाला. अंतिम फेरित भारताने इराणचा 33-29 अशा गुणांनी पराभव केला. 🇮🇳 𝗞𝗜𝗡𝗚𝗦 𝗢𝗙 𝗞𝗔𝗕𝗔𝗗𝗗𝗜! […]

Kabaddi Gold Medal

Kabaddi Gold Medal

India vs Iran Kabaddi Final, Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023)भारत विरुद्ध इराण (India vs Iran Kabaddi Final)असा कबड्डी सामना झाला. भारतीय कबड्डी संघानं हा सामना जिंकून सुवर्णपदक (Gold Medal)पटकावलं आहे. या सामन्यात मोठा वाद झाल्याचा पाहायला मिळाला. अंतिम फेरित भारताने इराणचा 33-29 अशा गुणांनी पराभव केला.

सामना संपायला फक्त 65 सेकंद बाकी असताना सामन्याचा स्कोअर 28-28 असा होता. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार पवन सेहरावत एन्ट्री मारायला जातो. ती डू अँड डायची रेड होती. यात पवनला कोणत्याही परिस्थितीत पॉइंट मिळवायचा होता. इराणी बचावपटूला स्पर्श करण्याच्या प्रयत्नात पवन लॉबीत गेला. त्यांच्यानंतर मॅटवर उपस्थित असलेले 4 इराणचे खेळाडूही लॉबीमध्ये गेले.

Chhota Rajan Gang Member Arrest : छोटा राजन टोळीतील गुंडाला अटक, मुंबई गुन्हे शाखेची कारवाई

त्यानंतर नव्या नियमानुसार रेड टाकण्यासाठी गेलेल्या नवीनला मैदानाबाहेर ढकलल्यामुळे भारतीय टीमला गुण मिळणे अपेक्षित होते. मात्र पंचांनी इराणला गुण दिल्यामुळे भारतीय टीमने त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर वातावरण गरम झाल्याचं पाहायला मिळालं. यावर पंचांनी निर्णय बदलून भारतीय टीमला 3 गुण तर इराणला 1 गुण दिला. त्यावर इराणच्या टीमध्ये आक्षेप घेतला. त्यामुळे काही वेळ खेळ प्रलंबित राहिला. हे नाट्य किमान तासभर सुरु राहिले. त्यामुळे हा सामना आतार्यंतचा सर्वाधिक लांबलेला सामना ठरला आहे.

Ajit Pawar : ‘जेव्हा सांगायचं असेल तेव्हा स्पष्टचं सांगून टाकेल’; नाराजीच्या चर्चांना अजितदादांचा फुलस्टॉप!

या सर्व गोंधळानंतर भारताला 3 आणि इराणला 1 गुण देण्याचा पंचांनी निर्णय घेतला. त्यानंतर सामना पुन्हा सुरु झाला. शेवटच्या मिनिटामध्ये टीम इंडियानं 31-29 अशी आघाडी घेतली. अन् शेवटच्या क्षणी भारतीय खेळाडूंनी आणखी गुण मिळवत 33 – 29 अशी आघाडी घेऊन या सामन्यात विजय मिळवला.

Exit mobile version