Download App

Asian Games : भारताने रचला इतिहास! 25 गोल्डसह 100 पदके पटकावली; वाचा यादी

Asian Games Medals Tally : चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी (Asian Games 2023) चमकदार कामगिरी करत पदकांची लयलूट सुरुच ठेवली आहे. आजही भारतीय महिला कबड्डी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत भारताला गोल्ड मेडल मिळवून दिले. या यशानंतर भारताला मिळालेल्या एकूण पदकांची संख्या 100 आणि त्यातील सुवर्णपदकांची संख्या 25 झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनीही ट्विट करत खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. भारतासाठी या स्पर्धेत महिला शुटिंग टीमने 24 सप्टेंबर रोजी पहिले पदक मिळवले होते. आता या पदकांची संख् शंभर झाली आहे. ऐतिहासिक अशीच ही कामगिरी आहे. कोणत्या क्रीडा प्रकारात ही पदके मिळाली याची माहिती घेऊ..

नेमबाजी – मेहुली घोष, रमिता आणि आशी चौकसे यांनी नेमबाजीत 10 मीटर एअर रायफल प्रकारात रजत पदक मिळवले.

रोइंग मेन्स डबल्स स्कल्स – अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंह यांनी लाइटवेट पुरुष डबल स्कल्समध्येड रौप्यपदक जिंकले.

रोइंग मेन्स पेयर – लेख राम आणि बाबूलाल यादव तिसऱ्या क्रमांकावर राहिले त्यांनी कांस्यपदक मिळवले.

रोइंग मेन्स एट – या स्पर्धेत नंतर भारताच्या संघाने रौप्यपदक जिंकले.

नेमबाजी – रमिता जिंदल हीने 10 मीटर एअर रायफल प्रकारात वैयक्तिक स्पर्धेत 230.1 स्कोअर करत कांस्यपदक पटकावले.

नेमबाजी पुरुष – दिव्यांश सिंह पवार, रुद्रांक्ष पाटील आणि ऐश्वर्य प्रताप सिंह यांनी या स्पर्धेतील पहिले गोल्ड मिळवले. 1893.7 स्कोअरसह 10 मीटर एअर रायफल प्रकारात यश मिळवले.

रोइंग मेन्स कॉक्सलेस फोर – जसविंदर सिंह, भीम सिंह, पुनीत आणि आशिष कुमार या चौघांनी चार स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला आणि कांस्यपदक जिंकले.

रोइंग पुरुष क्वाड्रपल स्कल्स – भारताने रोइंग प्रकारात कांस्यपदक मिळाले. सतनाम, परमिंदर जाकर आणि सुखमित या चार जणांनी तिसरा क्रमांक मिळवत कांस्य पदक पटकावले.

10 मीटर एअर रायफल वैयक्तिक पुरुष – ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर यांनी अन्य दोघा जणांबरोबर सुवर्णपदक पटकावले होते. त्यानेच नंतर पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवले.

25 मीटर रॅपिड फायर पिस्टल – आदर्श सिंह, अनीश भानवाला आणि विजयवीर सिद्धू या तिघांनी 1718 स्कोअरसह कांस्यपदक मिळवले.

महिला क्रिकेट – महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेचा 19 धावांनी पराभव करत सुवर्णपदक जिंकले.

Asian Games : नागपुरच्या पठ्ठ्यानं भेदलं तिरंदाजीत ‘सुवर्ण’; वाचा कोण आहे ओजस देवतळे

नाविक नेहा ठाकूर – नेहा ठाकूर हीने महिलांच्या डिंगी आयएलसीए4 स्पर्धेत 11 शर्यतीत 27 गुण मिळवत रौप्यपदक मिळवले.

नाविक इबाद अली – नौकायन स्पर्धेत अलीने कांस्यपदकाची कमाई केली. पुरुषांच्या विंडसर्फर आरएक्स स्पर्धेत त्याने 52 स्कोअरसह तिसरा क्रमांक मिळवला.

घोडेस्वारी – हृदय छेडा, दिव्यकृती सिंह, अनुष अग्रवाल आणमि सुदिप्ती हजेला यांच्या संघाने 209.205 अंकांसह सुवर्णपदक मिळवले.

50 मीटर थ्री पोजिशन रायफल टीम – या स्पर्धेत भारतीय संघाने रौप्यपदक मिळवले.

25 मीटर पिस्टल टीम स्पर्धा – मनू भाकर, ईशा सिंह आणि रिदम सांगवान यांनी 25 मीटर पिस्टल टीम स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले.

50 मीटर थ्री पोजिशन रायफल वैयक्तिक – या क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडूंनी शानदा प्रदर्शन केले. सिफ्त कौर हिने सुवर्णपदक मिळवले.

50 मीटर थ्री पोजिशन रायफल वैयक्तिक – या वैयक्तिक क्रीडा प्रकारात आशी चौकसे हिने कांस्यपदक जिंकले.

भारतीय पुरुष स्कीट शुटींग – या प्रकारात भारतीय संघाने कांस्यपदक मिळवले. अंगज बाजवा, गुरजोत सिंह खुंगरा आणि अनंत जीत सिंह नरूका यांनी 355 अंक घेत तिसरा क्रमांक मिळवला.

नेदरलँडसमोर बलाढ्य पाकिस्तान ऑलआऊट, बेस डी लीडेची घातक गोलंदाजी

नौकायन डिंगी पुरुष – या स्पर्धेत विष्णू सरवनन याने 34 अंकांसह कांस्यपदकाची कमाई केली.

महिला 25 मीटर पिस्टल – शुटिंगमध्ये ईशा सिंह हिने रौप्यपदक मिळवले.

शॉटगन स्कीट पुरूष – या स्पर्धेत अनंत नाकुराने रौप्य पदक मिळवले. त्याला 60 प्रयत्नांत 58 वेळा यश मिळाले.

वुशू सांडा – या क्रीडा प्रकारात रोशिबिना देवी या महिला खेळाडूने 60 किलोग्रॅम वुशू सांडा स्पर्धेत रौप्यपदक मिळवले.

पुरुष, 10 मीटर एअर पिस्टल – या प्रकारात सरबजोत सिंह, अर्जुन चीमा आणि शिव नरवाल यांनी चीनचा पाडाव करत सुवर्णपदक जिंकले.

घोडेस्वारी वैयक्तिक – या प्रकारात अनुश आणि त्याचा घोडा तिसऱ्या क्रमांकावर राहिला. 73.030 स्कोअरसह रौप्यपदक मिळाले.

शुटिंग – 10 मीटर एयर पिस्टल महिला टीमने रौप्यपदक मिळवले. ईशा सिंह, पलक आणि दिव्या यांनी कमाल केली.

शुटिंग – ऐश्वर्य प्रताप सिंह, स्वप्निल आणि अखिल यांच्या जोडीने कमाल केली. तिघांनी मिळून 50 मीटर रायफल स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

टेनिस – या क्रीडा प्रकारात भारताला रौप्यपदक मिळाले. साकेत माइनेनी आणि रामकुमार रामनाथन यांच्या जोडीने फायनलमध्ये पराभव स्वीकार केला. पण रौप्यपदक मिळवले.

Asian Games 2023 : बांग्लादेशचा पराभव! टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

शुटिंग – या क्रीडा प्रकारात महिलांनी गोल्ड मेडल मिळवले. पलकला गोल्ड तर ईशा सिंह हिला रौप्यपदक मिळाले.

स्क्वॅश – या क्रीडा प्रकारात भारताला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले. अनहत सिंह शेवटच्या सामन्यात 10-12 अशा फरकाने हाँगकाँगच्या ली विरुद्ध पराभूत झाला.

शुटिंग – 50 मीटर रायफल 3 पोजिशन पुरुष फायनल प्रकारात रौप्यपदक मिळाले. ऐश्वर्य प्रताप सिंह याने 459.7 अंक मिळवले.

ट्रॅक अँड फिल्ड – या प्रकारात किरण बालियान याने शॉटपूट म्हणजे गोळाफेक स्पर्धेत कांस्यपदक मिळवले.

शुटिंग मिश्रीत युगल 10 मीटर एयर रायफल – या स्पर्धेत सरबजोत आणि दिव्या यांच्या जोडीने रौप्यपदक मिळवले. फायनल मॅच चीनने 16-14 अशा फरकाने जिंकली.

टेनिस संयुक्त – या स्पर्धेत रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांच्या जोडीने सुवर्णपदकाची कमाई केली.

स्क्वॅश पुरुष टीम – या क्रीडा प्रकारात भारतीय पुरुष संघाने पाकिस्तानला हरवत सुवर्णपदक मिळवले.

अॅथलेटक्स 10000 मीटर रेस – या स्पर्धेत कार्तिक आणि गुलवीर या दोघांनी इतिहास रचला. दोघांनी चांगली कामगिरी करत कांस्यपदक जिंकले.

गोल्फ – या स्पर्धेत आदिती अशोक हीने रौप्यपदक मिळवले. तिचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले.

शुटिंग महिला ट्रॅप – महिला ट्रॅप टीमने रौप्य पदक जिंकले मनिषा कीर, राजेश्वरी कुमारी आणि प्रीति रजक यांनी 337 च्या स्कोअरसह पदक जिंकले.

शुटिंग पुरुष टीम – या शुटिंग स्पर्धेत किनान चेनाई, जोरावर सिंह आणि पृथ्वीराज टोंडिमान यांच्या संघाने कुवेत आणि चीनच्या आघाडीवर राहत 361 स्कोअर केला आणि सुवर्णपदक जिंकले.

ट्रॅप शुटिंग पुरुष – या स्पर्धेत किनान चेनाईने कांस्यपदक जिंकले.

बॉक्सिंग महिला – या स्पर्धेत महिलांच्या 50 किलोग्रॅम वजनी गटात निकहत जरीन हिने कांस्यपदक पटकावले. जरीने सेमीफायनल जिंकू शकली नाही.

3000 मीटर स्टीपलचेज – या स्पर्धेत अविनाश साबळे याने सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने 8-19-53 मिनिटांचा वेळ घेतला.

गोळाफेक – या स्पर्धेत तजिंदरपाल सिंह तूरने शानदार प्रदर्शन करत सुवर्णपदक जिंकले.

1500 मीटर रनिंग महिला – महिलांच्या रनिंग स्पर्धे हरमिलन बैंस हिने रौप्यपदक जिंकले. ती दुसऱ्या क्रमांकावर राहिली.

लाँग जम्प – या प्रकारात मुरली श्रीशंकर याने लांब उडी घेत रौप्यपदकाची कमाई केली. श्रीशंकरची 8.19 मीटर उडी दुसऱ्या क्रमांकावर राहिली.

हेप्टाथेलॉन – नंदिनी अगासरा हिने 800 मीटर हेप्टाथेलॉन या प्रकारात कांस्यपदक मिळवले. तिने 2-15-33 इतका वेळ घेतला.

डिस्कस थ्रो – डिस्कस थ्रो प्रकारात भारताच्या सीमा पुनिया हिने कांस्यपदक मिळवले.

100 मीटर अडथळा शर्यत – या प्रकारात ज्योति याराजी हिने 100 मीटर हर्डल रेसमध्ये रौप्यपदक मिळवले.

बॅडमिंटन – या प्रकारात पुरुष टीमने रौप्यपदक मिळवले. चीनच्या खेळाडूंनी गोल्ड मेडल मिळवले,

स्केटिंग 3000 मीटर – या स्पर्धेत संजना भटुला, कार्तिका जगदीश्वरन, हीरल साधू आणि आरती कस्तुरी यांनी स्पीड स्केटिंग 3000 मीटर स्पर्धेत कांस्यपदक मिळवले.

स्केटिंग 3000 मीटर पुरुष महिला टीम – आर्यनपाल घुमन, आनंदकुमार वेलकुमार, सिद्धांत कांबळे, विक्रम इंगळे यांनी 4-10-128 च्या वेळेसह तिसरा क्रमांक मिळवला. आणि कांस्यपदक जिंकले.

टेबल टेनिस महिला – अहकिया मुखर्जी, सुतीर्था यांच्या जोडीने कांस्यपदक मिळवले. दक्षिण कोरियाने सेमी फायनलमध्ये मात दिली.

3000 मीटर स्टीपलचेज महिला – या स्पर्धेत पारुल चौधरी रौप्य आणि प्रीतीने कांस्यपदक जिंकले.

लाँग जंप महिला – एनसी सोजन हिने लाँग जंप प्रकारात 6.63 मीटर उडी घेत दुसरा क्रमांक मिळवत रौप्यपदक जिंकले.

4 बाय 400 मीटर मिक्स्ड टीम शर्यत – या प्रकारात भारताला रौप्यपदक मिळाले.

नौकायन, पुरुष – अर्जुन सिंह आणि सुनील सिंह यांनी कॅनो डबल 1000 फायनलमध्ये कांस्यपदक जिंकले.

बॉक्सिंग – महिलांच्या बॉक्सिंग प्रकारात 54 किलोग्रॅम वजनी गटात प्रीतीने कांस्यपदक जिंकले.

400 मीटर अडथळा शर्यत महिला – या प्रकारात विद्या रामराज हिने तिसरा क्रमांक मिळवत कांस्यपदकाची कमाई केली.

5000 मीटर शर्यत महिला – पारुल चौधरी हिने या स्पर्धेत थेट सुवर्णपदक पटकावले.

800 मीटर शर्यत पुरुष – या प्रकारात भारताच्या अफजलने रौप्यपदक जिंकले.

ट्रिपल जंप पुरुष – प्रविण चित्रावेल याने या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.

पुरुष डेकेथलॉन – या प्रकारात तेजस्विन शंकर या खेळाडू्ने रौप्यपदक पटकावले.

महिला भाालाफेक – या स्पर्धेत अन्नू राणी हिने शानदार प्रदर्शन करत सुवर्णपदक जिंकले.

पुरुष बॉक्सिंग – या प्रकारात नरेंद्र बेरवाल याने 92 किलोग्रॅन वजन गटात कांस्यपदक जिंकले.

35 किमी रनिंग, मिक्स्ड टीम – या प्रकारात मंजू रानी आणि राम बाबू यांच्या जोडीने कांस्यपदक मिळवले.

तिरंदाजी मिक्स्ड टीम – ओजस देवतळे आणि ज्योति वेन्नम यांच्या जोडीने सुवर्णपदक जिंकले.

स्क्वॅश मिक्स्ड टीम – अनहत आणि अभय यांच्या जोडीने कांस्यपदक पटकावले. सेमी फायनलमध्ये त्यांना मलेशियाच्या जोडीने मात दिली.

बॉक्सिंग – महिलांच्या 75 किलोग्रॅम वजनगटात लवलीना बोरगोहेनने रौप्यपदक जिंकले. चीनच्या खेळाडूने फायनल जिंकली.

बॉक्सिंग पुरूष – या प्रकारात प्रविण हुड्डा याने कांस्यपदक मिळवले.

कुस्ती – ग्रीको रोमन स्टाइलमध्ये 87 किलो वजनगटात सुनील कुमार याने किर्गिस्तानच्या अताबेक याचा पराभव करत कांस्यपदक जिंकले.

400 मीटर रेस – या प्रकारात हरमिलन बैंस यांनी रौप्यपदक जिंकले.

5000 मीटर रनिंग – या प्रकारात अविनाश साबळे याने रौप्यपदक जिंकले.

400 मीटर रिले रेस महिला टीम – या प्रकारात महिलांच्या संघाने रौप्य पदक जिंकले.

भालाफेक – या स्पर्धेत भारताने सुवर्ण आणि रौप्य या दोन्ही पदकांची कमाई केली. नीरज चोपडा याने सुवर्ण तर किशोर जेना याने रौप्यपदकाची कमाई केली.

400 मीटर रिले रेस पुरुष टीम – या प्रकारात भारताने सुवर्णपदक जिंकले.

कंपाउंड तिरंदाजी, महिला टीम – अदिती, ज्योती आणि परनीत या तिघींच्या जोडीने सुवर्णपदक जिंकले.

स्क्वॅश मिक्स्ड टीम – या स्पर्धेत दिपीका आणि हरिंदर यांच्या जोडीने सुवर्णपदक जिंकले.

कंपाउंड तिरंदाजी पुरुष टीम – या प्रकारात ओजस देवतळे, अभिषेक वर्मा आणि जावकर प्रथमेश समाधान यांच्या टींमने सुवर्णपदक जिंकले.

स्क्वॅश पुरुष एकल – या प्रकारात सौरव घोषाल हा अंतिम सामन्यात पराभूत झाला त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

कुस्ती – अंतिम पंघाल हिने कुस्तीत मंगोलियाच्या बोलोरतुया बात ओचिरचा पराभव करत कांस्यपदक जिंकले.

तिरंदाजी महिला रिकर्व टीम – या प्रकारात अंकित भकत, सिमरनजीत कौर, भजन कौर यांनी कांस्यपदक जिंकले.

बॅडमिंटन पुरुष एकल – या स्पर्धेत एचएस प्रणय रॉय याला सेमी फायनलमध्ये चीनकडून पराभवाचा धक्का बसला. त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

सेपक टकरा महिला टीम – या प्रकारात महिला संघाने चांगली कामगिरी करत कांस्यपदक जिंकले.

रिकर्व तिरंदाजी पुरुष टीम – या प्रकारात पुरुषांच्या संघाने रौप्यपदक जिंकले.

कुस्ती – महिलांच्या 62 किलोग्रॅम वजन गटात सोनम हिने चीनच्या लाँग जिया हिला पराभूत करत कांस्यपदक जिंकले.

कुस्ती – महिलांच्या 76 किलो वजनगटात फ्रीस्टाइल प्रकारात किरण बिश्नोई हिने कांस्यपदक मिळवले.

कुस्ती – याच प्रकारात 20 वर्षीय अमनने कांस्यपदक जिंकले. तांत्रिक आधारावर चीनच्या मिंगू लियू या खेळाडूकडून पराभूत व्हावे लागले.

ब्रिज, पुरुष टीम – या क्रीडा प्रकारात भारतीय संघाने रौप्यपदक जिंकले. जग्गी शिवदासानी, राजेश्वर तिवारी, संदीप ठकराल, राजू तोलानी, अजय खरे आणि सुमित मुखर्जी यांच्या संघाने रौप्य पदक जिंकले.

हॉकी, पुरुष टीम – भारतीय हॉकी संघाने अंतिम सामन्यात जपानचा 5-1 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले.

कंपाउंड तिरंदाजी महिला – या प्रकारात अदितीने कांस्यपदक जिंकले. इंडोनिशियाच्या रतिह फदली हिचा पराभव केला.

कंपाउंड तिरंदाजी महिला – याच प्रकारात ज्योति सुरेखा वेन्नम हिने शानदार प्रदर्शन करत सुवर्णपदक मिळवले.

कंपाउंड तिरंदाजी पुरुष – कंपाउंड तिरंदाजीत भारताला दोन पदके मिळाली. ओजस देवतळे याने गोल्ड तर अभिषेक वर्मा याने रौप्य पदक जिंकले.

कबड्डी महिला – भारतीय महिला कबड्डीपटूंनी ऐतिहासिक कामगिरी करत तैवानचा पराभव करत सुवर्णपदकाची कमाई केली. या विजयाबरबरोच भारताच्या खात्यात शंभरावं पदक पडलं.

Tags

follow us