नेदरलँडसमोर बलाढ्य पाकिस्तान ऑलआऊट, बेस डी लीडेची घातक गोलंदाजी

नेदरलँडसमोर बलाढ्य पाकिस्तान ऑलआऊट, बेस डी लीडेची घातक गोलंदाजी

World Cup 2023 : आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा दुसरा सामना पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला जात आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेदरलँड्स संघाने चांगली सुरुवात केली आणि अवघ्या 38 धावांवर पाकिस्तानने 3 विकेट गमावल्या. मात्र, त्यानंतर मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी पाकिस्तानचा डाव सांभाळत सन्मानजनक धावसंख्या गाठली.

मात्र, पाकिस्तानचा संघ पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही. पाकिस्तानचा संपूर्ण संघ 49 षटकांत 286 धावा करून ऑलआऊट झाला. पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा मोहम्मद रिझवानने 75 चेंडूत 68 धावा केल्या आणि सौद शकीलने 52 चेंडूत 68 धावा केल्या. याशिवाय मोहम्मद नवाजने 39 धावांची तर शादाब खानने 32 धावांची खेळी खेळली. या 4 फलंदाजांशिवाय पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला 20 धावाही करता आल्या नाहीत. बाबर आझमलाही या सामन्यात केवळ 5 धावा करता आल्या. अशा प्रकारे पाकिस्तानने 49 षटकात 286 धावा केल्या आणि सर्वबाद झाला.

Asian Games : अंतिम फेरीत जपानचा पराभव; 9 वर्षांनी भारतीय हॉकी संघाची ‘सुवर्ण’ मोहोर

नेदरलँडने 8 गोलंदाजांचा वापर केला
नेदरलँड्सच्या कर्णधाराने आपल्या 8 गोलंदाजांचा वापर केला आणि बेस डी लीडेने सर्वाधिक 4 बळी घेतले. त्याने मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान आणि हसन अली यांच्या 9 षटकांत 62 धावा देऊन विकेट घेतल्या. त्याच्याशिवाय कॉलिन अकरमनने 8 षटकांत 39 धावा देत 2 बळी घेतले. त्यांच्याशिवाय आर्यन दत्त, लोगन व्हॅन बीक आणि पॉल व्हॅन मीकरेन यांनीही प्रत्येकी 1 बळी घेण्यात यश मिळवले.
राहुल गांधींच्या केसाला धक्का लावला तर ‘सळो की पळो करुन सोडू’; पटोलेंचा भाजपला इशारा

हैदराबादच्या खेळपट्टीवर 286 धावांचा पाठलाग करणे फार अवघड नाही. आता या विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला हरवून नेदरलँड्स या लक्ष्याचा पाठलाग करून मोठा अपसेट निर्माण करू शकतो का, हे पाहावे लागेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube