मोहीम फत्ते; आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची सर्वोत्तम कामगिरी,107 पदकांवर कब्जा

Asian Games Medal Tally: आशियाई क्रीडा स्पर्धेतील (Asian Games 2023) भारताची मोहीम फत्ते झाली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करत भारतीय खेळाडूंनी 107 पदके जिंकली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारताने 100 पदकांचा टप्पा ओलांडला आहे. 28 सुवर्ण व्यतिरिक्त भारताने 38 रौप्य आणि 41 कांस्य पदके जिंकली आहेत. मात्र, पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर […]

Asian Games Medal Tally

Asian Games Medal Tally

Asian Games Medal Tally: आशियाई क्रीडा स्पर्धेतील (Asian Games 2023) भारताची मोहीम फत्ते झाली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करत भारतीय खेळाडूंनी 107 पदके जिंकली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारताने 100 पदकांचा टप्पा ओलांडला आहे. 28 सुवर्ण व्यतिरिक्त भारताने 38 रौप्य आणि 41 कांस्य पदके जिंकली आहेत. मात्र, पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर आहे. पदकतालिकेत चीन अव्वल राहिला. यानंतर जपान आणि दक्षिण कोरिया अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी 5 पदके जिंकून शानदार सुरुवात केली. यानंतर दुसऱ्या दिवशी भारताने 6 पदके जिंकली. तर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या दिवशी भारताने अनुक्रमे 3, 8 आणि 3 पदकांवर कब्जा केला. भारतीय खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीचा क्रम इथेच थांबला नाही. सहाव्या, सातव्या, आठव्या आणि नवव्या दिवशी भारताने अनुक्रमे 8, 5, 15 आणि 7 पदके जिंकली. भारतीय खेळाडूंनी दहाव्या, अकराव्या, बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या दिवशी अनुक्रमे 9, 12, 5, 9 आणि 12 पदके जिंकली.

Asian Games 2023 : चिराग-सात्विक जोडीने केला पराक्रम, बॅडमिंटन स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक

वर्ल्ड कपमध्ये बांग्लादेशची धडाकेबाज सुरुवात; अफगाणिस्तानचा दारुण पराभव

भारताची सर्वोत्तम कामगिरी
यापूर्वी भारताने आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 मध्ये सर्वोत्तम कामगिरी केली होती. जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 70 पदके जिंकली होती. पण आता भारतीय खेळाडूंनी आपले जुने विक्रम मागे टाकले आहेत. मात्र, 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत चीनचा दबदबा दिसून आला. चीनने 194 सुवर्णांसह 368 पदके जिंकली. यानंतर जपानने 48 सुवर्णांसह 177 पदके जिंकली. दक्षिण कोरिया 39 सुवर्ण पदकांसह तिसर्‍या स्थानावर आहे. तर भारत चौथ्या स्थानावर राहिला.

Exit mobile version