Download App

Ashes 2023: उस्मान ख्वाजाच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाची 386 धावापर्यंत मजल, इंग्लंडला मिळावी 7 धावांची लीड

  • Written By: Last Updated:

AUS vs ENG 1st Test: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात 2023 च्या ऍशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना बर्मिंगहॅम येथे खेळवला जात आहे. इंग्लंडच्या 393 गावांच्या प्रतिउत्तरात रविवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 386 धावा केल्या. यामुळे इंग्लंडला 7 धावांची लीड मिळाली. यादरम्यान उस्मान ख्वाजाने शतक झळकावले. त्याने 141 धावांची शानदार खेळी केली. अॅलेक्स कॅरी आणि ट्रॅव्हिस हेड यांनी अर्धशतके झळकावली. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉड आणि ओली रॉबिन्सन यांनी 3-3 बळी घेतले. मोईन अलीनेही 2 बळी घेतले. (aus-vs-eng-1st-test-australia-all-out-on-386-runs-edgbaston-birmingham-usman-khawaja-ashes-2023)

इंग्लंडने पहिला डाव 393 धावांवर घोषित केला होता. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ 386 धावांवर सर्वबाद झाला. ख्वाजाने 321 चेंडूत 141 धावा केल्या. त्याने 14 चौकार आणि 3 षटकार मारले. अॅलेक्स कॅरीने 99 चेंडूंचा सामना करत 66 धावा केल्या. त्याने 10 चौकार आणि 1 षटकार मारला. हेडने 63 चेंडूत 50 धावा केल्या. त्याने 8 चौकार आणि 1 षटकार मारला.

ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या डावात डेव्हिड वॉर्नर आणि ख्वाजा सलामीला आले. वॉर्नर अवघ्या 9 धावा करून बाद झाला. यानंतर मार्नस लबुशेन शून्य धावांवर बाद झाला. कॅमेरून ग्रीनने 68 चेंडूत 38 धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्स 38 धावा करून बाद झाला. स्कॉट बोलँड शून्यावर बाद झाला.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

इंग्लंडकडून ऑली रॉबिन्सनने शानदार गोलंदाजी केली. त्याने 22.1 षटकात 55 धावा देत 3 बळी घेतले. रॉबिन्सनने 5 मेडन षटकेही घेतली. स्टुअर्ट ब्रॉडने 23 षटकात 68 धावा देत 3 बळी घेतले. त्याने 4 मेडन ओव्हर्स काढल्या. मोईनलाही दोन बळी मिळाले. त्याने 33 षटकात 147 धावा देत 2 बळी घेतले. जेम्स अँडरसन आणि बेन स्टोक्स यांनाही प्रत्येकी एक यश मिळाले.

इंग्लंडने 8 विकेट गमावून 393 धावा करून पहिला डाव घोषित केला होता. संघासाठी जो रूटने नाबाद शतक झळकावले. त्याने 118 धावा केल्या होत्या. जॅक क्रॉलीने 61 धावा केल्या. बेअरस्टोने 78 धावांचे योगदान दिले.

Tags

follow us