Download App

मॅक्सवेलचं तुफान! थरारक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव; ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी 20 सामन्यांच्या (AUS vs SA) मालिकेतील शेवटचा सामना शनिवारी झाला.

AUS vs SA T20I : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी 20 सामन्यांच्या (AUS vs SA) मालिकेतील शेवटचा सामना शनिवारी झाला. या सामन्यात कांगारूंना दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन (Australia) सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने तुफान (Glenn Maxwell) फलंदाजी केली. त्याच्या कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा सामना 2 गडी राखून जिंकला.

या सामन्यात मॅक्सवेल ऑस्ट्रेलियन टीमच्या विजयाचा हिरो ठरला. मॅक्सवेलने 8 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 36 चेंडूत 62 धावा केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 10 धावांची गरज होती. लुंगी एनगिडीच्या ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूवर मॅक्सवेलने दोन धावा काढल्या. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. नंतर पाचव्या चेंडूवर पुन्हा एक चौकार मारून संघाला विजयी केले.

पाकिस्तानी खेळाडू नापास, बोर्ड पगार कापणार; सीनियर खेळाडूंना बसणार कोट्यावधींचा फटका

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 173 धावांचे टार्गेट दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ट्रॅव्हिस हेड आणि कर्णधार मिचेल मार्शने ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी 66 धावांची भागीदारी केली. दोघांच्या या भागीदारीने ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला होता. मार्शने 37 चेंडूत 54 तर हेडने 18 चेंडूत 19 धावांचे योगदान दिले.

चांगली सुरुवात मिळाल्यानंतरही नियमित अंतरात विकेट पडत राहिल्या. एकावेळी 122 धावांवर सहा विकेट पडल्या होत्या. त्यामुळे कांगारू दडपणाखाली आले. परंतु, येथे ग्लेन मॅक्सवेलने संघाला सावरले. दक्षिण आफ्रिकेच्या हातातील सामना अक्षरशः हिसकावून घेतला. कॉर्बिन वॉशने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. क्वेन मफाका आणि कागिसो रबाडाने प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या.

डेवाल्ड ब्रेविसचे तुफान अर्धशतक

याआधी टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेने सात विकेटच्या मोबदल्यात 172 धावा केल्या. डेवाल्ड ब्रेविसने 6 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 26 चेंडूत 53 धावा केल्या. रासी वॅन डर डुसेनने 3 चौकारांच्या मदतीने 26 चेंडूत नाबाद 38 धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्स (25) आणि लुआन ड्रे प्रीटोरियस (24) या दोघांनीही चांगली फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिसने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. अॅडम झाम्पा आणि जोश हेजलवूड यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

न्यूझीलंडच्या खेळाडूचा अजब निर्णय, अचानक टीमच बदलली; आता ‘या’ देशाकडून करणार बॅटिंग

या मालिकेतील पहिला सामन्यात ऑस्टेलियाने 17 धावांनी विजय मिळवला होता. यानंतर एडेन मार्करमच्या नेतृत्वातील दक्षिण आफ्रिकेने पलटवार करत दुसरा सामना 53 धावांनी जिंकला होता. आता तिसऱ्या सामन्यात मात्र पुन्हा कांगारूंनी विजय मिळवत सीरिज देखील जिंकली आहे.

follow us