Glenn Maxwell : ‘मॅक्सवेल’च्या तुफानी खेळीचा ‘हिटमॅन’ला फटका; मोठं रेकॉर्ड संकटात
Glenn Maxwell : गुवाहाटीच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा(Australia) स्टार फलंदाज ग्लेन मॅक्सवेलची (Glenn Maxwell ) जादू दिसली. एकवेळ भारताचा ताब्यात असलेल्या सामना मॅक्सवेलने फिरवत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला आहे. ग्लेन मॅक्सवेलने पुन्हा एकदा ट्वी-20 स्फोटक शतक झळकविले आहे. प्रसिद्ध कृष्णाच्या शेवटच्या चेंडूवर मॅक्सवेलने चौकार मारत ऑस्ट्रेलियाला पाच विकेटने विजय मिळवून दिला आहे. याचबरोबर पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत आजचा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने कमबॅक केले आहे. या सामन्यात मॅक्सवेलने तुफानी फटकेबाजी करत भारताच्या हातातील विजय अक्षरशः हिसकावून नेला. मॅक्सवेलच्या या खेळीने ऑस्ट्रेलियाचा विजय तर झालाच पण रोहित शर्माचं (Rohit Sharma) रेकॉर्डही धोक्यात आणलं.
Ind Vs Aus : रोमहर्षक सामन्यात कांगारुंना नमवलं; भारताचा 2 गडी राखून विजय
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज रोहित शर्मा आहे. त्याने आतापर्यंत चार शतके ठोकली आहेत. कालच्या सामन्यात त्याच्या याच विक्रमाची बरोबरी मॅक्सवेलने केली. आता आणखी एक शतक केले की तो रोहितच्या पुढे निघून जाईल. मॅक्सवेलचे हे भारताविरुद्ध टी 20 मधील दुसरे शतक आहे. याआधी 2019 मध्ये बंगळुरू येथे झालेल्या सामन्यात मॅक्सवेलने शतक केले होते. या सामन्यात देखील ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता.
शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाला 43 धावांची गरज होती. पण यादवने 19 वी ओव्हर फिरकीपटू अक्षर पटेलला दिली. या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी 22 धावा काढल्या. यादव म्हणाला, आम्ही मॅक्सवेलला लवकर आऊट करण्याच्या प्रयत्नात होतो. तीच आमची प्लॅनिंग होती. पण, या मैदानावर ओलावा जास्त होता. यामुळे गोलंदाजांना जास्त अडचणी जाणवत होत्या. शेवटची ओव्हर वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला (Prasidh Krishna) दिली. या एका ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 21 धावा आवश्यक होत्या. या धावाही भारताला रोखता आल्या नाहीत. या ओव्हरमध्ये कृष्णाने अगदीच सुमार गोलंदाजी केली. समोर मॅक्सवेलसारखा झुंजार फलंदाज असताना फुलटॉस चेंडू फेकले. मग काय मॅक्सवेलने तुफान फटकेबाजी करत भारताकडून सामना हिसकावून नेला
IND vs AUS 3rd T20I : टीम इंडियाचं कुठं चुकलं? सुर्यकुमारने केला मोठा खुलासा
गायकवाडचे शतक व्यर्थ
भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad ) विश्वविजेता ऑस्ट्रेलियाची (Australia) गोलंदाजी फोडून काढली. ऋतुराजने स्फोटक खेळत टी-20 क्रिकेटमधील पहिले शतक झळकाविले. पाच टी-20 सामन्याच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऋतुराजने 52 चेंडूत शतक ठोकले. तो 123 धावांवर नाबाद राहिला. ऋतुराजने आपल्या खेळीत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्र यानंतरही ऑस्ट्रेलियाने भारताच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला त्यामुळे ऋतुराजचे शतकही भारताल विजयी करू शकले नाही. आता पुढील सामन्यात सामना जिंकण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल.