Download App

ऑस्ट्रेलियाला धक्का! धडाकेबाज गोलंदाज मिचेल स्टार्कची टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज गोलंदाज मिचेल स्टार्कने टी 20 आंतरराष्ट्रीय (Mitchel Stark) क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

Mitchel Stark Retirement : क्रिकेटविश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज गोलंदाज मिचेल स्टार्कने टी 20 आंतरराष्ट्रीय (Mitchel Stark) क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. स्टार्कने एकूण 65 टी 20 सामन्यांत 79 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने निवृत्ती जाहीर (Cricket Australia) केल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाला त्याच्या जागी नव्या गोलंदाजाचा शोध घ्यावा लागणार आहे. या निर्णयाची माहिती देताना स्टार्क म्हणाला की आगामी भारत दौरा, अॅशेज मालिका आणि 2027 मधील विश्वकप स्पर्धा यांचा विचार करून टी 20 क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय मी घेतला. स्टार्कने याआधी जून 2024 मध्ये भारताविरुद्ध शेवटचा टी 20 सामना खेळला होता.

कसोटी क्रिकेट माझ्यासाठी नेहमीच प्राधान्याची बाब राहिली आहे. ऑस्ट्रेलियासाठी टी 20 सामने खेळताना मी नेहमीच आनंदाचा अनुभव घेतला. विशेष करून 2021 मधील टी 20 वर्ल्डकप स्पर्धा. यावेळी आम्ही फक्त (T20 World Cup) पुरस्कारच मिळवले नाही तर त्यावेळी आमचा संघ देखील दर्जेदार होता, असेही मिचेल स्टार्क यावेळी म्हणाला.

तासाभरात मोडला पॅट कमिन्सचा विक्रम, मिचेल स्टार्कसाठी ‘या’ संघानं मोजले तब्बल 24.75 कोटी

स्टार्कने सांगितलं निवृत्तीचं कारण

पुढील वर्षात ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचं शेड्यूल खूप व्यस्त राहणार आहे. बांग्लादेश विरुद्ध टी 20 मालिका, दक्षिण आफ्रिका दौरा, न्यूझीलंडविरुद्ध चार सामन्यांची मालिका, जानेवारी 2027 मध्ये ऑस्ट्रेलियाचा पाच कसोटी सामन्यांचा भारत दौरा यांचा समावेश आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने भारत दौरा महत्वाचा आहे. यानंतर दक्षिण आफ्रिका, नामिबीया आणि झिम्बाब्वेत 2027 वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धाही महत्वाच्या आहेत. त्यामुळे टेस्ट आणि वनडेला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असे स्टार्कने सांगितले.

भारताविरुद्धची कसोटी मालिका, अॅशेज आणि त्यानंतरचा एकदिवसीय क्रिकेट विश्वकप या स्पर्धांत सर्वोत्तम कामगिरी करणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वतःला फीट ठेवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. 2026 मध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी नवीन गोलंदाजी तयार करण्यासाठी संघ व्यवस्थापनालाही वेळ मिळेल असेही स्टार्कने स्पष्ट केले.

मिचेल स्टार्कच्या टी 20 क्रिकेट करिअरबद्दल बोलायचं झालं तर सप्टेंबर 2012 मध्ये स्टार्कने टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने अखेरचा टी 20 सामना भारताविरुद्ध जून 2024 मध्ये (India vs Australia) खेळला होता. 12 वर्षांच्या कारकिर्दीत स्टार्कन एकूण 65 टी 20 सामन्यांत 79 विकेट्स घेतल्या आहेत.

मॅक्सवेलचं तुफान! थरारक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव; ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली

follow us