कांगारूंचा विजयरथ रोखलाच! इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाचा पराभव; हॅरी ब्रूक चमकला..
AUS vs ENG 3rd ODI : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या (AUS vs ENG) जात असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या संघाने चमकदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाच्या विजय (Australia) रथाला ब्रेक लावला. या सामन्यात इंग्लंडने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ऑस्ट्रेलियाला 46 धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 ओव्हर्समध्ये 304 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने 37.4 ओव्हर्समध्ये 254 धावा (Team England) केल्या होत्या. त्यानंतर पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही. अशा प्रकारे डकवर्थ लुईस नियमाचा वापर करण्यात येऊन इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले.
इंग्लंडकडून कर्णधार हॅरी ब्रूकने (Harry Brook) नाबाद शतक केले. ब्रुकने 94 चेंडूंत 110 धावा केल्या. तर विल जॅक्सने 82 चेंडूंत 84 धावा केल्या. लियम लिविंगस्टोन 33 धावांवर नाबाद राहिला. या फलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर इंग्लंडला सामना जिंकण्यास मदत झाली. हॅरी ब्रुकच्या या शतकी खेळीच्या बळावरच इंग्लंडला सामना जिंकता आला.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Stark) आणि कॅमरून ग्रीन यांनी विकेट घेतल्या. स्टार्कने 8 ओव्हर्समध्ये 2 विकेट्स घेतल्या. तर ग्रीनने 6 ओव्हर्समध्ये 45 रन देत दोन विकेट्स घेतल्या. या दोघांव्यतिरिक्त जोश हेजलवूड, सीन एबॉट, ऑरोन हार्डी, ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि मॅथ्यू शॉर्ट यांना एकही विकेट मिळाली नाही.
इंग्लंडचा पराभव अन् मोठं रेकॉर्डही; एकाच सामन्यात ऑस्ट्रेलियाची मोठी कामगिरी..
अॅलेक्स केरी अन् स्टिव्ह स्मिथचा आधार
नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने 50 ओव्हर्समध्ये 304 धावा केल्या. विकेटकीपर फलंदाज अॅलेक्स कॅरीने सर्वाधिक 77 धावा केल्या. स्टिव्ह स्मिथने 60 धावांचे (Steve Smith) योगदान दिले. ऑरोन हार्डीने 44 धावा केल्या तर मॅक्सवेलने 30 धावांची खेळी केली.
दरम्यान, याआधी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला (AUS vs ENG) धूळ चारली होती. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 68 धावांनी (Australia) पराभव केला होता. पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 270 धावा केल्या होत्या. माफक आव्हान होते तरी देखील इंग्लंडला यश मिळाले नाही. या विजयासह ऑस्ट्रेलियाच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झाली. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव करत सलग 14 एकदिवसीय सामने जिंकले आहेत.
Aus Vs Sco : ऑस्ट्रेलियाचा विश्वविक्रम, हेडची तुफानी इनिंग, स्कॉटलंडला ठोकले 6 षटकात 113 धावा