इंग्लंडचा पराभव अन् मोठं रेकॉर्डही; एकाच सामन्यात ऑस्ट्रेलियाची मोठी कामगिरी..
AUS vs ENG 2nd ODI : ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला (AUS vs ENG) धूळ चारली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 68 धावांनी (Australia) पराभव केला. पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 270 धावा केल्या होत्या. माफक आव्हान होते तरी देखील इंग्लंडला (England) यश मिळाले नाही. या विजयासह ऑस्ट्रेलियाच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झाली. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव करत सलग 14 एकदिवसीय सामने जिंकले आहेत.
मागील वर्षभरात ऑस्ट्रेलियाने सलग 14 सामने जिंकले आहेत. सलग सामने जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाने केला आहे. याआधी 2003 मध्ये सलग 21 सामने जिंकले होते. या यादीत श्रीलंका तिसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेने 2023 मध्ये सलग 13 सामने जिंकले होते. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा क्रमांक आहे. आफ्रिका संघाने 2005 मध्ये सलग 12 एकदिवसीय सामने जिंकले होते. पाकिस्तानच्या नावावर सलग 12 विजयांची नोंद आहे.
Australia vs Scotland: जोश इंग्लिसचे टी-20 त वेगवान शतक; षटकार आणि चौकारांचा पाऊस !
इंग्लंडचा मोठा पराभव
दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ पूर्ण 50 ओव्हर्स खेळू शकला नाही. 44.4 ओव्हर्समध्ये फक्त 270 धावांवर संघ ऑलआउट झाला. अॅलेक्स कॅरीने सर्वाधिक 74 धावा केल्या. मिचेल मार्शने 60 धावा केल्या. इंग्लंडकडून बेयरडन कॉर्सने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. याशिवाय मॅथ्यू पोट्स, आदिल रशीद आणि जेकब बेथलने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. ओली स्टोनने एक विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाच्या 270 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ढेपाळला. एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही. 40.2 ओव्हर्समध्ये 202 धावांवर इंग्लंडचा डाव संपु्ष्टात आला. इंग्लंडकडून जॅमी स्मिथने सर्वाधिक 49 धावा केल्या. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. यानंतरच्या तिसऱ्या सामन्यात जर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला तर मालिका विजयही ऑस्ट्रेलियाच्या नावावर होईल.
ट्रॅव्हिस हेडची तुफान खेळी! पहिल्याच सामन्या ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला चारली धूळ..