ट्रॅव्हिस हेडची तुफान खेळी! पहिल्याच सामन्या ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला चारली धूळ..
AUS vs ENG 1st T20I : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात बुधवारी पहिला टी 20 सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने तुफान खेळ करत इंग्लंडचा दारुण पराभव केला. साउथेम्प्टन शहरातील द रोज बाउल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 28 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ बाद झाला होता. तरी देखील सामन्यात शानदार वापसी करत कांगारूंनी इंग्लंडला धूळ चारली.
नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरला नाही. फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी 19.3 ओव्हर्समध्ये सर्वबाद 179 धावा केल्या. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) वादळी खेळी केली. 23 चेंडूत 8 चौकार आणि चार षटकरांच्या मदतीने हेडने 59 धावा केल्या. याशिवाय मॅथ्यू शॉर्टने 41 धावा केल्या. इंग्लंडच्या लियाम लिविंगस्टोनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
Team India Australia Tour : टीम इंडिया-ऑस्ट्रेलियाच्या कसोटीसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाची मोठी घोषणा
धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लिश फलंदाजांना मात्र आव्हान पार करता आलं नाही. 19.2 ओव्हर्समध्ये 151 धावांवर संघ ऑलआउट झाला. लियाम लिविंगस्टोनने 27 चेंडूत चार चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 37 धावा केल्या. त्याच्याशिवाय एकाही फलंदाजाला विशेष कामगिरी करता आली नाही.
ऑस्ट्रेलियाच्या सीन एबॉटने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. या दरम्यान त्याने 3.2 ओव्हर्समध्ये 28 धावा दिल्या. जोश हेजलवूड आणि अॅडम झाम्पाने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. जेवियर बार्टलेट, कॅमरून ग्रीन आणि मार्कस स्टोइनिस यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
Team England : टीम इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूने चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा