BAN vs AFG: ढाका येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यात बांगलादेशने अफगाणिस्तानचा 546 धावांनी पराभव केला. 21 व्या शतकातील कसोटी क्रिकेटमधील हा सर्वात मोठा विजय आहे. बांगलादेशने पहिल्या डावात 382 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ 146 धावांवर गारद झाला. यानंतर बांगलादेशने दुसऱ्या डावात 4 विकेटच्या मोबदल्यात 425 धावा करत अफगाणिस्तानला केवळ 115 धावांत गुंडाळले. अशाप्रकारे बांगलादेशने 546 धावांनी मोठा विजय नोंदवला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा तिसरा सर्वात मोठा विजय आहे.(ban-vs-afg-bangladesh-won-by-546-runs-afghanistan-najmul-hossain-shanto-largest-victories-in-test-cricket)
नजमुल हुसेन शांतोने दोन्ही डावात शतके झळकावली
अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीत बांगलादेशच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. पहिल्या डावात सलामीवीर महमुदल हसनने 76 आणि तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज नजमुल हुसेन शांतोने 146 धावांचे शानदार शतक झळकावले. त्याचवेळी मुशफिकुर रहीमने 47 आणि मेहंदी हसन मिराजने 48 धावा केल्या. यानंतर वेगवान गोलंदाज इबादत हुसेनने गोलंदाजीत चार बळी घेतले. दुसरीकडे तैजुल इस्लाम, मेहंदी हसन मिराज आणि शरीफुल इस्लाम यांना प्रत्येकी दोन यश मिळाले.
Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा
बांगलादेशकडून दुसऱ्या डावात नजमुल हुसेन शांतोने पुन्हा एकदा शतक झळकावले. यावेळी शांतोने 124 धावा केल्या. दोन्ही डावात शतक झळकावल्याबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. याशिवाय मोमिनुल हकने 121 धावा केल्या. त्याचवेळी सलामीवीर झाकीर हसनने 71 आणि कर्णधार लिटन दासने नाबाद 66 धावा केल्या. गोलंदाजीत तस्किन अहमदने चार आणि शरीफुल इस्लामने तीन बळी घेतले. इबादत हुसेन आणि मेहंदी हसन मिराज यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
बांगलादेशने 546 धावांनी कसोटी जिंकून 112 वर्षे जुना विक्रम मोडला
कसोटी क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत बांगलादेशचा आता तिसरा सर्वात मोठा विजय आहे. या विक्रमी यादीत इंग्लंड पहिल्या तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. 1928 मध्ये इंग्लंडने 675 धावांनी विजय मिळवला होता. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने 1934 मध्ये कसोटी सामना 562 धावांनी जिंकला होता.