T20 World Cup 2026 : पुढील महिन्यापासून सुरु होणाऱ्या आयसीसी टी20 क्रिकेट विश्वचषकांमध्ये आतापर्यंत अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. 7 फेब्रुवाारीपासून सुरु होणाऱ्या या विश्वचषकातून सुरक्षेच्या कारणावरुन बांगलादेशने माघार घेतल्यानंतर या स्पर्धेसाठी आयसीसीकडून स्कॉटलंडला जागा देण्यात आली आहे. तर दुसरीकडे आता पुन्हा या स्पर्धेसाठी बांगलादेशाला संधी मिळणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या स्पर्धेत बांगलादेशने भारतात सुरक्षेच्या कारणास्तव खेळण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्तानने देखील या स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी दिली आहे. तर आता या वादात एक मोठी बातमी समोर येत आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्ड (Bangladesh) म्हणजेच बीसीबी आणि आयसीसीच्या (ICC) वादात हस्तक्षेप करणे पाकिस्तानला महागात पडू शकते. जर पाकिस्तानने टी20 विश्वचषक स्पर्धेतून माघार घेतली तर आयसीसी पुन्हा एकदा या स्पर्धेत बांगलादेशला संधी देण्याचा विचार करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर पाकिस्तान संघाने टी20 विश्वचषकावर बहिष्कार टाकला तर आयसीसी पाकिस्तानच्या जागी बांगलादेशला संधी देणार.
याबाबत एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, जर पाकिस्तानने माघार घेतली तर बांगलादेशला ग्रुप ए मध्ये जागा देण्यात येईल आणि पाकिस्तानचे (Pakistan) सर्व सामने श्रीलंकेत होणार. बीसीबी देखील बांगलादेशचे सर्व सामने श्रीलंकेत (Sri Lanka) खेळवण्यात यावे अशी मागणी करत होता.
Salman Agha leads a power-packed Pakistan squad for the upcoming #T20WorldCup 👊
More 👉 https://t.co/tlDOMYUZma pic.twitter.com/2jqGAQQJBT
— ICC (@ICC) January 25, 2026
पीसीबी लवकरच निर्णय घेणार?
पाकिस्तान टी20 विश्वचषक 2026 मध्ये खेळणार की नाही यासाठी पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहेबाज शरीफ यांची भेट घेत याबाबत चर्चा केली आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना नक्वी यांनी सांगितले की, आयसीसीने बांगलादेशवर अन्याय केला आहे. पाकिस्तान या स्पर्धेत खेळणार की नाही याबाबत पंतप्रधान निर्णय घेणार आहे. ते शुक्रवार किंवा सोमवारपर्यंत पाकिस्तान संघ विश्वचषकासाठी श्रीलंकेला जाईल की नाही हे ठरवतील.
पाकिस्तानने संघ जाहीर
टी20 विश्वचषक वगळण्याच्या धमक्या असूनही, पाकिस्तान संघाने आपला संघ जाहीर केला. निवडकर्ता आकिब जावेद यांनी सांगितले की त्यांचे काम संघ निवडणे आहे आणि पाकिस्तान सरकार विश्वचषकासाठी संघ पाठवेल की नाही हा त्यांचा निर्णय असेल.
Budget 2026 : बजेट अन् लाल रंगाचं नात काय?; पेटाऱ्यातून समोर आली इंट्रेस्टिंग स्टोरी
टी20 विश्वचषक 2026 साठी पाकिस्तान संघ
सलमान अली आघा (कर्णधार), अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अशरफ, फखर जमान, ख्वाजा मोहम्मद नाफे (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शाह, साहिबजादा फरहान, सैम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान, उस्मान खान आणि उस्मान तारिक.
