BCCI Announces India Squad for T20 World Cup 2024 : T20 World Cup 2024 साठी भारतीय संघाची आज बीसीसीआयकडून (BCCI) घोषणा करण्यात आली आहे. T20 World Cup 2024 साठी बीसीसीआयने 15 खेळाडूंची निवड केली आहे. या संघाचा नेतृत्व रोहित शर्मा (Rohit Sharma) करणार आहे तर उपकर्णधार हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) निवड करण्यात आली आहे. तर या संघात के. एल. राहुलला (K.L.Rahul) स्थान देण्यात आले नाही.
बीसीसीआयने मोठा निर्णय घेत ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि संजू सॅमसनला (Sanju Samson) संघात स्थान दिला आहे. तर याच बरोबर रिंकू सिंग, शुभमन गिल, आवेश खान आणि खालील अहमदला राखीव ठेवले आहे.
T20 World Cup 2024 मध्ये भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंड विरुद्ध होणार आहे तर 9 जून रोजी भारत पाकिस्तान विरुद्ध सामना खेळणार आहे. यूएसए विरुद्ध 12 जून रोजी तर 15 जून रोजी भारतीय संघ कॅनडा विरुद्ध सामना खेळणार आहे.
T20 World Cup 2024 साठी भारतीय संघ : रोहित शर्मा ( कर्णधार), हार्दिक पांड्या ( उप कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
🚨India’s squad for ICC Men’s T20 World Cup 2024 announced 🚨
Let's get ready to cheer for #TeamIndia #T20WorldCup pic.twitter.com/jIxsYeJkYW
— BCCI (@BCCI) April 30, 2024
राखीव खेळाडू – शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद
टीम इंडियाचे टी-20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक
5 जून – टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड
9 जून – टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान
12 जून – टीम इंडिया विरुद्ध यूएसए
महाबचत ऑफर! अवघ्या 20 हजारात खरेदी करता येणार iPhone 12, iPhone 14
15 जून – टीम इंडिया विरुद्ध कॅनडा