गौतम गंभीरची होणार हकालपट्टी? लाजिरवाण्या पराभवानंतर बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

BCCI On Gautam Gambhir : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानात झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 असा पराभव भारतीय संघाला स्वीकारावा

BCCI On Gautam Gambhir

BCCI On Gautam Gambhir

BCCI On Gautam Gambhir : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानात झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 असा पराभव भारतीय संघाला स्वीकारावा लागला आहे. यानंतर भारतीय संघासह बीसीसीआयवर क्रिकेट चाहत्यांकडून जोरदार टीका होताना दिसत आहे. तर दुसरीकडे क्रिकेट चाहते आणि भारतीय संघाचे अनेक माजी खेळाडू मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक पदावरुन हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी करत आहे. त्यामुळे गौतमी गंभीर मुख्य प्रशिक्षक पदावर राहणार की जाणार याबाबात सध्या अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर आता गंभीरच्या प्रशिक्षकाबाबत बीसीसीआयमधून एक मोठी आणि महत्वाची माहिती समोर आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार गौतम गंभीर (Gautam Gambhir) तिन्ही फॉरमॅटमध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून राहणार आहे. गंभीरवर आतापर्यंत कोणताही निर्णय बीसीसीआयने (BCCI) घेतलेला नाही. गौतम गंभीर या पदावर 2027 विश्वचषकापर्यंत राहणार असल्याची चर्चा आहे. बीसीसीयने 2024 मध्ये तीन वर्षांसाठी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

तर दुसरीकडे गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ (Team India) भारतात कसोटी क्रिकेटमध्ये काही खास करु शकला नसला तरी इंग्लंडमध्ये पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने शानदार कामगिरी करत पाच सामन्यांची मालिका 2-2 ने ड्रॉ केली होती. याच बरोबर भारतीय संघाने चॅम्पियन्स टॉफी आणि आशिया कप 2025 गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली जिंकला आहे.

श्रीलंकेत Cyclone Ditwah ने केला कहर; 47 जणांचा मृत्यू तर 21 जण बेपत्ता

गंभीरच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका जिंकली होती तर न्यूझीलंडविरुद्ध 3-0 आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2-0 असा पराभव भारतीय संघाला स्वीकारावा लागला आहे.

Exit mobile version