Bhuvneshwar Kumar Team India: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. भुवनेश्वरने नोव्हेंबर 2022 मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. यानंतर तो टीम इंडियात पुनरागमन करू शकला नाही. भुवनेश्वरने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या बायोमध्ये बदल केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. अनेक ट्विटर हँडलने भुवनेश्वरच्या निवृत्तीसंदर्भातील प्रश्न ट्विट केले आहेत. (bhuvneshwar kumar changed his instagram bio retirement speculation)
वास्तविक भुवनेश्वरने इंस्टाग्राम अकाऊंटच्या बायोमधून भारतीय क्रिकेटपटू काढून. त्याऐवजी त्यांनी फक्त भारतीय लिहिले आहे. भुवनेश्वरचा हा बदल चर्चेत आला आहे. ट्विटरवर अनेक यूजर्सनी भुवीच्या निवृत्तीबद्दल ट्विट केले आहे. मात्र, याबाबत भुवनेश्वरकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. भुवी आता 33 वर्षांचा आहे. पण तो जानेवारी 2022 नंतर भारताच्या वनडे संघात परतला नाही. आणि शेवटची कसोटी जानेवारी 2018 मध्ये खेळली गेली.
गदर 2 चं महाभारताशी आहे खास कनेक्शन; दिग्दर्शकांनी केला खुलासा…
विशेष म्हणजे भुवनेश्वर हा काही काळापासून टीम इंडियाचा सर्वात महत्त्वाचा गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 21 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने 63 बळी घेतले आहेत. यादरम्यान त्याची एका सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 96 धावांत 8 बळी. भुवनेश्वरने 121 वनडेत 141 विकेट घेतल्या आहेत. त्याने 87 टी-20 सामन्यात 90 विकेट घेतल्या आहेत. भुवनेश्वरने इंडियन प्रीमियर लीगमध्येही प्रभावी कामगिरी केली आहे. त्याने आयपीएलच्या 160 सामन्यात 170 विकेट घेतल्या आहेत.
This is really Heartbreaking For Indian Cricket 💔
Give him a atleast One Chance to prove him pic.twitter.com/ozJOVmVGPw— MSDian™ (@AdityaSingh5143) July 27, 2023