Download App

बीसीसीआयचा इशान किशनसह श्रेयस अय्यरला मोठा धक्का! केली ‘ही’ कारवाई

BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने (BCCI) क्रिकेटपटू इशान किशन (Ishan Kishan)आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer )यांना मोठा धक्का दिला आहे. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना केंद्रीय कराराच्या (central contract)यादीतून काढून टाकलं आहे. सतत इशारे देऊनही इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी रणजी ट्रॉफीकडे(ranji trophy) दुर्लक्ष केले. आता त्यांच्यावर बीसीसीआयने कारवाई केली आहे. हे दोन्ही खेळाडू आता बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीत नाहीत. बीसीसीआयने नवीन केंद्रीय करार असलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

विक्रांतच्या ‘द साबरमती रिपोर्ट’चा धमाकेदार टिझर रिलीज, उलगडणार गोध्रा कांडाचं सत्य

बीसीसीआयने जाहीर केलेल्या यादीमध्ये,
ग्रेड A+ : रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.
ग्रेड A : रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या.
ग्रेड B : सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल.
ग्रेड C : रिंकू सिंग, टिळक वर्मा, रुतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.

ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यावर बीसीसीआय काही दिवसांपासून खूश नव्हती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेतल्यानंतर किशनला सातत्याने पुनरागमन करुन रणजी ट्रॉफी खेळण्याच्या सूचना देण्यात आल्या. पण किशनने बीसीसीआयच्या सूचनेकडं दुर्लक्ष केलं आणि झारखंडच्या एकाही रणजी सामन्यात सहभाग घेतला नाही.

दुसरीकडं श्रेयस अय्यर वेगळ्याच वादात अडकला. खराब कामगिरीमुळं अय्यरला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळलं होतं. रणजी ट्रॉफी न खेळण्यासाठी अय्यरने दुखापतीचं कारण पुढं केलं. पण राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीने अय्यरचा खोटारडेपणा उघड केला. एनसीएने स्पष्ट केले की, अय्यर मॅच खेळण्यासाठी फिट आहे आणि त्याला खेळण्यात कोणतीही अडचण नाही.

बीसीसीआयने यंदा 30 खेळाडूंना करारबद्ध केलं आहे. हा करार 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे. मंडळाने यावेळी नवी परंपरा सुरु केली आहे. त्यात वेगवान गोलंदाजीचा वेगळा करारही केला आहे. या यादीत आकाश दीप, विजयकुमार वैश्यक, उमरान मलिक, यश दयाल आणि विद्वथ कवेरप्पा यांचा समावेश आहे.

follow us