Josh Hazlewood : ऑस्ट्रेलिया संघ सध्या वेस्टइंडिज दौऱ्यावर (AUSVsWI) असून या दौऱ्यावर तीन कसोटी आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळत आहे. या दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून मालिकेत आघाडी घेतली आहे. तर या मालिकेचा शेवटचा आणि तिसरा कसोटी सामना 13 जुलैपासून सुरु होणार आहे. हा सामना डे-नाईट स्वरुपात खेळला जाणार आहे. तर यानंतर दोन्ही संघात पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे.
ऑस्ट्रेलिया संघाने अचानक संघात दोन मोठे बदल केले आहे. माहितीनुसार, स्टार गोलंदाज जोश हेझलवुड (Josh Hazelwood) या मालिकेत खेळताना दिसणार नाही. हेझलवुडसह स्पेन्सर जॉन्सन (Spencer Johnson) देखील या मालिकेत दिसणार नाही. 20 जुलैपासून टी-20 मालिका सुरू होणार आहे. या मालिकेचा पहिला सामना जमैकामधील सबिना पार्क येथे खेळला जाईल. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आधीच आपला 16 सदस्यीय संघ जाहीर केला होता, परंतु आता त्यात दोन बदल करण्यात आले आहेत.
बातमी फेक, राजीनामा दिला नाही; प्रदेशाध्यक्षपदाबाबत जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा
क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) ने वेगवान गोलंदाज जोश हेझलवुड आणि स्पेन्सर जॉन्सन यांच्या जागी सलामीवीर फलंदाज जॅक फ्रेझर मॅकगर्क आणि युवा वेगवान गोलंदाज झेवियर बार्टलेट यांचा संघात समावेश केला आहे. कसोटी मालिका संपल्यानंतर हेझलवुड ऑस्ट्रेलियाला परतेल, जिथे तो पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी तयारी करेल. तर स्पेन्सर जॉन्सन अद्याप त्याच्या पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही, ज्यामुळे त्याला टी-20 संघातून वगळण्यात आले आहे.