Download App

भारत-वेस्ट इंडिजच्या 100व्या कसोटी सामन्यात ब्रायन लाराने रोहित शर्माला दिले खास गिफ्ट

  • Written By: Last Updated:

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळवला जात आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा 100 वा कसोटी सामना आहे? त्याचवेळी वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा याने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला मोमेंटो दिला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये रोहित शर्मा आणि ब्रायन लारा मोमेंटोसोबत दिसत आहेत.(Brain Lara Present Memento To Rohit Sharma On 100th Test Between Ind Vs Wi)

दोन्ही देशांत आतापर्यंत कोण ठरले वरचढ?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 99 कसोटी सामने खेळले गेले आहेत. भारताविरुद्ध कसोटी सामन्यांमध्ये वेस्ट इंडिज वरचढ असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध 30 कसोटी सामने जिंकले आहेत. तर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध 23 कसोटी सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. याशिवाय भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 46 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. मात्र, गेल्या 21 वर्षांपासून वेस्ट इंडिजला भारताविरुद्ध कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवता आलेला नाही.

IND vs WI: नाणेफेक जिंकत वेस्ट इंडिजने घेतला गोलंदाजीचा निर्णय, मुकेश कुमारचे कसोटीत पदार्पण

टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका जिंकू शकेल का?

दुसरीकडे, भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या कसोटीत भारताने वेस्ट इंडिजचा सहज पराभव केला. पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 141 धावांनी पराभव केला. अशाप्रकारे भारतीय संघ 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. मात्र, आता दोन्ही संघ पोर्ट ऑफ स्पेनमध्ये आमनेसामने आहेत. पोर्ट ऑफ स्पेन कसोटी जिंकून भारतीय संघ मालिका आपल्या नावावर करू इच्छितो. तर कॅरेबियन संघाच्या नजरा हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याकडे असतील. तथापि, कोणता संघ जिंकतो हे पाहणे मनोरंजक असेल?

Tags

follow us