Download App

Varun Chakravarthy : आधी क्रिकेटर नंतर आर्किटेक्ट, नोकरीही केली; आता टीम इंडियाचा हिरो

साखळी फेरीतील न्यूझीलंड विरुद्धच्या (IND vs NZ) सामन्यात वरुणने पाच विकेट घेत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.

ICC champions Trophy Varun Chakraborty : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी फेरीतील सामन्यात (Champions Trophy 2025) भारताने न्यूझीलंडचा पराभव केला होता. या सामन्यात वरुण चक्रवर्तीच्या (Varun Chakraborthy) फिरकीसमोर किवी फलंदाजांनी अक्षरशः शरणागती पत्करली. वरुण या सामन्याचा हिरो ठरला होता. यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या (IND vs AUS) सामन्यातही वरुणने चांगली कामगिरी केली. त्याची गोलंदाजी खेळताना फलंदाजाना अनेक अडचणी येत होत्या. आयसीसी वनडे रँकिंगमध्ये (ICC One Day Rankings) सुद्धा वरुणने टॉप 100 खेळाडूंच्या यादीत एन्ट्री घेतली. चला तर मग आज याच वरुण बद्दल काही खास माहिती घेऊ या..

साखळी फेरीतील न्यूझीलंड विरुद्धच्या (IND vs NZ) सामन्यात वरुणने पाच विकेट घेत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. वरुणचा इथपर्यंतचा प्रवास कुणालाही प्रेरणादायक असाच आहे. 29 ऑगस्ट 1991 रोजी कर्नाटकातील बीदर (Karnataka) येथे जन्मलेल्या वरुणने वयाच्या 13 व्या वर्षापासूनच क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती.

वरुण-विराटची कमाल रोहितला मात्र धक्का.. आयसीसी रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा

वरुणचे शिक्षण किती

वरुण चक्रवर्तीचे सुरुवातीचे शिक्षण चेन्नईच्या केंद्रीय (Chennai) विद्यालयात सीएलआरआय आणि सेंट पॅट्रिक अँग्लो इंडियन हायर सेकंडरी स्कूलमधून झाले. क्रिकेटचा शौकीन असलेल्या वरुणने 2017 मध्ये मात्र क्रिकेट बाजूला केलं आणि आर्किटेक्ट होण्याचा निर्णय घेतला. वरुणने एसआरएम विद्यापीठ तमिळनाडू येथून आर्किटेक्चरची पदवी घेतली. आयसीसी टूर्नामेंटमधील सामन्यानंतर वरुण म्हणाला की मी खूप उशिराने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. ज्यावेळी मी 26 वर्षांचा होतो. त्यावेळी मी क्रिकेटच्या मैदानावर वापसी केली. याआधी त्याला आर्किटेक्ट व्हायचं होतं तसेच चित्रपटही तयार करायचे होते.

आर्किटेक्ट म्हणून करिअरला सुरुवात केल्यानंतरही वरुणचा कल क्रिकेटकडेच होता. सन 2015 मध्ये क्रॉम्बेस्ट क्रिकेट क्लबकडून मिडीयम पेसर म्हणून त्याने क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. परंतु गुडघ्याच्या दुखापतीनंतर त्याला पुन्हा क्रिकेट थांबवावं लागलं. तरीही वरुणने हार मानली नाही. पुढे स्पिन गोलंदाजीत नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. 2018 मधील तमिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेत मदुरै पँथर्स संघाकडून खेळताना वरुणने आपल्या मिस्ट्री स्पिनने सर्वांनाच चकित केले.

पुढे 2018-19 मधील विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत (Vijay Hajare Trophy) वरुणने तमिळनाडूकडून लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या स्पर्धेतील 9 सामन्यात 22 विकेट्स घेऊन टूर्नामेंट मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला.

ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, स्टीव्ह स्मिथची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

follow us