India vs Australia कसोटी सामन्याचा तिसरा दिवस, पावसामुळे खेळ थांबला

India vs Australia कसोटी सामन्याचा तिसरा दिवस, पावसामुळे खेळ थांबला

India vs Australia Brisbane test 3rd day report: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात (India vs Australia) ब्रिस्बेनमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. पहिल्या दिवशी केवळ 13.2 षटकेच खेळता आली,  दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली नाही. मात्र, तिसऱ्या दिवशी पुन्हा पावसाने व्यत्यय (Cricket News) आणला. पावसामुळे जवळपास दोन सत्रांचा खेळ खराब झाला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघ पहिल्या डावाच्या आधारे 394 धावांनी पिछाडीवर होता.

पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी प्रामाणिकपणे पार पाडली, पण…मुनगंटीवारांच्या शब्दाशब्दात खंत

भारताला डावाच्या सुरुवातीलाच धक्का बसला.ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी त्यांच्या धावसंख्येत 40 धावांची भर घातली. त्यांचा डाव 445 धावांवर संपल्यानंतर लगेचच पावसाला सुरुवात (India vs Astralia brisbane test 3rd day) झाली. सुमारे अर्धा तास प्रतीक्षा केल्यानंतर भारताचा डाव सुरू झाला. दुसऱ्या चेंडूवरच भारताने यशस्वी जैस्वालची विकेट गमावली. यानंतर शुबमन गिलही डावाच्या तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला. या दोन्ही विकेट मिचेल स्टार्कने घेतल्या. आठव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विराट कोहली देखील बाद झाला.

कोहलीची विकेट पडताच पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. त्यानंतर पंचांनी काही काळ ब्रेक दिल्यानंतर पुन्हा सामना सुरू झाला आणि केवळ सात चेंडू टाकल्यावर पाऊस परतला. 40 मिनिटांच्या विश्रांतीनंतर 3.5 षटकांच्या गोलंदाजीनंतर पुन्हा पावसाने सुरुवात केली आणि यावेळीही अर्ध्या तासाचा ब्रेक लागला. ऋषभ पंतची विकेट पडली, पावसाने खेळ थांबवला सामना सुरू होताच भारताने चौथ्या चेंडूवर ऋषभ पंतची विकेट गमावली.

कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, शिवतारे संतापले

पंत बाद झाल्यानंतर पावसाने पुनरागमन करताना केवळ दोन चेंडू टाकले. या ब्रेक दरम्यान पंचांनी चहापानाची वेळ घोषित केली. यावेळी दोन तासांहून अधिक काळ खेळ थांबवून नंतर सामना सुरू करण्यात आला. 2.5 षटके संपताच पाऊस पुन्हा परतला. यावेळी थोड्या प्रतीक्षेनंतर स्टंप घोषित करण्यात आले. भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ पाचव्यांदा थांबवण्यात आला. पावसानंतर सामना काही काळच सुरू होऊ शकला. भारतीय संघाला केवळ तीन धावांची भर घालता आली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने चार गडी गमावून 51 धावा केल्या होत्या.

भारताची सुरुवात खूपच खराब झाली.डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर यशस्वी जैस्वाल बाद झाला. यानंतर शुभमन गिललाही स्टार्कने बाद केले आणि त्याला एकच धाव करता आली. विराट कोहलीकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण तोही केवळ 3 धावा करून जोश हेझलवूडचा बळी पडला. सामन्यात पावसाचा व्यत्यय असल्याने दिवसभर खेळ विस्कळीत होत आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube