India vs Australia 4th Test : बॉर्डर गावस्करचा अखेरचा सामना खास, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची उपस्थिती

India vs Australia 4th Test : बॉर्डर गावस्करचा अखेरचा सामना खास, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची उपस्थिती

अहमदाबाद : भारत आणि ऑस्टेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर या ट्रॉफिमधील आज अखेरचा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याचं आजचं वैशिष्ट्ये म्हणजे आजचा सामना हा अहमदाबादच्या मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे. तर या सामन्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्टेलियाचे पंतप्रधान अ‍ॅंथनी अल्बनीज हे देखील उपस्थित आहेत.

या स्टेडिअममध्ये हे दोन्ही पंतप्रधान दाखल झाले आहेत.एक डिप्लोमसीचा भाग म्हणून ही राजकीय भेट आणि मैत्रीसंबंध वाढवण्याचा हा प्रयत्न आहे. या सामन्या दरम्यान या दोन्ही पंतप्रधानांना फॉलअप फेमची एक सफर त्यांना घडवली जाईल. यामध्ये त्यांना रवी शास्त्री हे भारत आणि ऑस्टेलिया या दोन देशांमधील क्रिकेटचा इतिहस सांगणार आहेत. त्यानंतर ते दोघे फ्रेंडशिप फॉलअप फेमचं उद्घाटन करतील.

दरम्यान आता या सामन्याला सुरूवात झाली आहे. यामध्ये ऑस्टेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याची निर्णय घेतला आहे. चौथ्या सामन्याच्या कसोटी मालिकेत भारताने 2-1 ने आघाडी घेतली आहे. अहमदाबादच्या मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजीकरिता अनुकूल अशी मानली जात आहे. सध्या सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये केएस भरतची फलंदाजीतील वाईट कामगिरी लक्षात घेऊन भारतीय टीम व्यवस्थापनाने झारखंडचा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनला चौथ्या आणि अंतिम कसोटी सामना बोलावण्याचा मोठा निर्णय घेतला.

त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये देखील समावेश करण्याची शक्यता आहे. केएस भरतला मागील वर्षापासून ऋषभ पंतचा बॅकअप म्हणून तयार केले जात होते आणि तो भारत ‘अ’ संघाचा नियमित सदस्य होता. मात्र, तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 3 कसोटी सामन्यांच्या 5 डावांत केवळ 8, 6, 23, 17 आणि 3 धावा केला आहे.

चौथ्या कसोटीत इशान किशन की केएस भरत नेमकं कोणाला मिळणार संधी ? राहुल द्रविडने दिला इशारा

केएस भरतचे शांत आणि वळण घेणाऱ्या विकेट्सवर विकेटकीपिंग मात्र प्रभावी ठरणार आहे. इंदोरमध्ये तो अपयशी ठरला ही वेगळी गोष्ट. पण 5 डावामध्ये केवळ 57 धावा करणे भारतीय संघाकरिता फायदेशीर ठरणार नाही. चेंडू वळण घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर धावा काढण्याकरिता भारतीय फलंदाज धडपडत असताना व्यवस्थापनाला चांगल्या खेळीची अपेक्षा राहणार होती.

दोन्ही संघातील खेळाडूंची यादी:

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सूर्यकुमार यादव, जयदेव उनाडकट.

ऑस्ट्रेलिया: स्कॉट बोलँड, अ‍ॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मॅट कुहनमन, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube