Download App

‘तो’ रील पडला महागात; सुरेश रैना, हरभजन आणि युवराज सिंगवर गुन्हा दाखल

Case filed क्रिकेटपटू युवराज सिंग, हरभजन सिंग, सुरेश रैना आणि गुरकीरत मान यांना एक रील बनवणं चांगलंच महागात पडलं आहे.

Case filed Against Suresh Raina, Harbhajan And Yuvraj Singh due to Reel : माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग, हरभजन सिंग, (Harbhajan And Yuvraj Singh) सुरेश रैना (Suresh Raina) आणि गुरकीरत मान यांना एक रील बनवणं चांगलंच महागात पडलं आहे. या वादग्रस्त इंस्टाग्राम रील प्रकरणी त्यांच्यावरती दिव्यांग लोकांची थट्टा केल्या प्रकरणी गुन्हा (Case filed) देखील दाखल झाला आहे.

ग्राहकांना धक्का, ऑनलाईन फूड ऑर्डरसाठी मोजावे लागणार जास्त पैसे, जाणून घ्या नवीन दर

नेमकं प्रकरण काय आहे?

नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स स्पर्धेमध्ये खेळल्यानंतर या खेळाडूंनी विनोदी पद्धतीने आपल्या शरीराची स्थिती मांडली होती. यासाठी या माजी क्रिकेटपटूंनी त्यांच्या इंस्टाग्राम हॅण्ड वर एक रील पोस्ट केली होती. ज्यामध्ये ते अभिनेता विकी कौशलच्या आगामी चित्रपटातील गाणं तोबा-तोबा या व्हायरल गाण्याच्या बिट्सवर लंगडताना दिसत होते.

मात्र अशा प्रकारे दिव्यांग लोकांप्रमाणे हावभाव केल्याने त्यांचा अवमान झाला. असा आरोप भारताची पॅरा बॅडमिंटन स्टार मानसी जोशी हिने एका पोस्टच्या माध्यमातून केला. तिने या पोस्टमध्ये दिव्यांग लोकांची या क्रिकेटपटूंनी खिल्ली उडवल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली. दरम्यान तिच्या संतापानंतर हरभजन सिंगने ताबडतोब ही रील काढून टाकली. तसेच इंस्टाग्राम च्या स्टोरी वरती त्याने दिव्यांगांची माफी देखील मागितली.

NEET Paper Leak : पेपर चोरणाऱ्या दोघांना सीबीआयकडून अटक!

मात्र तरी देखील नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर डिसेबल्ड पीपल या संस्थेचे कार्यकारी संचालक आरमान अली यांनी या क्रिकेटपटूंविरोधात तक्रार दाखल केल्याने हे प्रकरण अद्याप देखील संपलेले नाही. तसेच या क्रिकेटपटूंसह मेटा इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांच्यावर देखील या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

follow us