Download App

Champions Trophy 2025 भारताच्या अडचणी वाढणार? न्यूझीलंडच्या संघात ‘या’ स्टार खेळाडूची एंट्री

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीपुर्वी (Champions Trophy 2025) न्यूझीलंड (New Zealand) संघाने संघात मोठा बदल केला आहे.

  • Written By: Last Updated:

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीपुर्वी (Champions Trophy 2025) न्यूझीलंड (New Zealand) संघाने संघात मोठा बदल केला आहे. स्टार वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन (Lockie Ferguson) दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी न्यूझीलंडने संघात स्टार गोलंदाज काइल जेमीसनचा (Kyle Jamieson) संघाच समावेश केला आहे. काइल जेमीसनचा भारताविरोधात रेकॉर्ड चागंल असल्याने न्यूझीलंड भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यात सर्वांचे लक्ष काइल जेमीसनकडे असणार आहे.

जेमीसनने 13 एकदिवसीय सामन्यांमध्ये 511 धावा केल्या आहेत आणि 11 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना 2023 मध्ये न्यूझीलंडच्या बांगलादेश दौऱ्यादरम्यान होता, जिथे त्याने 20 धावा केल्या आणि सात षटकांत धावा देत 2 विकेट घेतल्या होत्या.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी कराची येथे अफगाणिस्तानविरुद्धच्या अनधिकृत सराव सामन्यात गोलंदाजी केल्यानंतर फर्ग्युसनला उजव्या पायात वेदना जाणवल्या आणि प्राथमिक वैद्यकीय तपासणीत असे दिसून आले की तो संपूर्ण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी फिट नाही. त्यामुळे पायाच्या दुखापतीमुळे लॉकी फर्ग्युसन आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधून बाहेर पडला आहे.

तर दुसरीकडे काइल जेमीसन आज संध्याकाळी पाकिस्तानला रवाना होणार आहे. त्यामुळे तो 19 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी उपलब्ध राहणार नाही. डिसेंबरमध्ये सुपर स्मॅशमध्ये जेमीसनने कॅन्टरबरी किंग्जसाठी स्थानिक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. तो पाठीच्या दुखापतीमुळे झालेल्या फ्रॅक्चरवर उपचार करण्यासाठी 10 महिने क्रिकेटपासून दूर होता.

शिवजयंती निमित्त गर्भसंस्कारांवर आधारीत डॉ. विष्णू माने यांचा जिजाऊंचे बाळकडू कार्यक्रम

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न्यूझीलंड संघ

मिचेल सँटनर (कर्णधार), केन विल्यमसन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, विल ओ’रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नाथन स्मिथ, विल यंग, ​​जेकब डफी आणि काइल जेमिसन

follow us